ATM: डिजिटल पेमेंट उपलब्ध असले तरी, आजही अनेकजण एटीएममधून पैसे काढतात. पण एटीएम सेवा मोफत नसते हे सर्वांनाच माहीत आहे. आता SBI ने या शुल्कामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या एटीएम व्यवहारांवरील शुल्कात वाढ केली आहे. मोफत व्यवहारांची मर्यादा संपल्यानंतर एटीएम वापरणे महाग होईल. विशेषतः इतर बँकांचे एटीएम वापरणाऱ्या SBI खातेधारकांवर याचा परिणाम होईल.
25
कॅश काढण्यासाठी किती शुल्क लागेल?
मासिक मोफत मर्यादा संपल्यानंतर इतर बँकेच्या एटीएममधून पैसे काढल्यास, प्रत्येक व्यवहारासाठी २३ रुपये (GST सह) आकारले जातील. पूर्वी हे शुल्क फक्त २१ रुपये होते. आता शुल्कात वाढ झाली आहे.
35
बॅलन्स चेक केल्यासही शुल्क लागणार
पैसे काढले नाहीत तरीही आता खर्च करावा लागेल. बॅलन्स चेक, मिनी स्टेटमेंट यांसारख्या नॉन-फायनान्शियल व्यवहारांसाठी प्रत्येक वेळी ११ रुपये (GST सह) द्यावे लागतील. यातही काही व्यवहार मोफत असतील.
हे नवीन शुल्क काही खात्यांवर लागू होणार नाहीत. बेसिक सेव्हिंग्ज बँक डिपॉझिट (BSBD) खाती, SBI एटीएम वापरणारे SBI डेबिट कार्डधारक आणि किसान क्रेडिट कार्ड खातेधारकांवर कोणताही अतिरिक्त भार पडणार नाही.
55
शुल्क वाढवण्यामागे काय आहे कारण?
अलीकडेच इंटरचेंज फी वाढल्यामुळे SBI ने हा निर्णय घेतला आहे. बचत खातेधारकांसाठी महिन्याला ५ मोफत व्यवहार पूर्वीप्रमाणेच सुरू राहतील. ही मर्यादा ओलांडल्यानंतरच नवीन शुल्क लागू होईल. त्यामुळे एटीएमचा वापर करणाऱ्यांनी नियोजन करणे महत्त्वाचे आहे.