आजकाल बऱ्याच जणांमध्ये आर्थिक शिस्त वाढते आहे. बदलत्या गरजा आणि वाढत्या खर्चाच्या पार्श्वभूमीवर बचत करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. बचतीमध्ये कोणताही धोका न घेता चांगला परतावा मिळवण्याचे मार्ग शोधले जातात. अशांसाठी पोस्ट ऑफिसने अनेक योजना आणल्या आहेत. पोस्ट ऑफिसमधील एक उत्तम योजना म्हणजे RD.
25
काय आहे RD योजना?:
केंद्र सरकारची संस्था पोस्ट ऑफिस ही RD योजना देते. रिकरिंग डिपॉझिट म्हणजेच RD ही बचत योजना गुंतवणूकदारांना कोणताही धोका न घेता सुरक्षित परतावा देते. या योजनेत दरमहा १०० रुपयांपासून गुंतवणूक करता येते. कोणताही धोका न घेता निश्चित परतावा मिळतो. यावरील व्याजदर स्थिर असतो.
या योजनेचा कालावधी ५ वर्षे आहे. मध्येच पैसे काढायचे असतील तर ३ वर्षांनंतर काढता येतात. पण व्याज कमी मिळेल. नाहीतर कर्जही घेता येते.
35
५ वर्षांत १४ लाख मिळवायचे असतील तर..
जर तुम्हाला ५ वर्षांत १४ लाख मिळवायचे असतील तर RD योजनेत दरमहा २०,००० रुपये गुंतवावे लागतील. असे ५ वर्षे गुंतवणूक केल्यास एकूण १२,००,००० रुपये होतील. त्यावर सुमारे २,२७,३२० रुपये व्याज मिळेल. असे एकूण १४,२७,३२० रुपये मिळतील.
हे सध्याच्या व्याजदरावर आधारित आहे. भविष्यात व्याजदरात बदल झाल्यास परताव्यातही बदल होईल. सध्या RD योजनेवर ६.७ टक्के व्याज मिळते.
55
खाते कसे उघडायचे?
RD योजनेत गुंतवणूक करण्यासाठी पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन RD खाते उघडण्यासाठी अर्ज भरावा लागतो. त्यासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड आणि एक पासपोर्ट साईजचा फोटो लागतो. नॉमिनीचे नाव द्यावे लागते. किमान १०० रुपयांनी खाते उघडता येते. दरमहा बचत करू इच्छिणाऱ्यांसाठी ही योजना उत्तम आहे.