स्टँडबाय पॉवरमुळे घरातील विजेचा वापर थोडा वाढतो, पण तो कंट्रोल केल्यानं प्रत्येक घरात सारखीच बचत होत नाही. घरातल्या उपकरणांची संख्या, त्यांचा वीज वापर, स्टँडबाय क्षमता, वापराची वेळ आणि विजेचे दर यावर बचत अवलंबून असते. त्यामुळे 'रात्री उपकरणं अनप्लग केल्यास वर्षाला इतके युनिट्स नक्की वाचतील' असं ठामपणे सांगता येत नाही.
थोडक्यात, झोपण्यापूर्वी घरात एकदा फिरून वापरात नसलेले चार्जर, अॅडॉप्टर आणि अनावश्यक इलेक्ट्रॉनिक उपकरणं प्लगमध्ये आहेत का, हे तपासण्याची सवय लावणं चांगलं आहे. यामुळे अनावश्यक स्टँडबाय पॉवरचा वापर टाळता येतो. त्याच वेळी, फ्रीज, मेडिकल उपकरणं आणि सिक्योरिटी कॅमेरे यांसारखी सतत चालू ठेवावी लागणारी उपकरणं चुकूनही अनप्लग करू नका. अशा छोट्या सवयी वीज वापर आणि महिन्याचा खर्च नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात.