Salary Hacks: पगार येताच अकाऊंट रिकामं होतं?, या ५ सोप्या ट्रिक्स नक्की वापरा

Published : Mar 05, 2026, 07:56 PM IST

Salary Hacks: प्रत्येक महिन्याला पगार जमा झाल्यावर काही तास अकाऊंट भरलेलं दिसतं, पण नंतर बघता बघता सगळा बॅलन्स गायब होतो. EMI, घरभाडं, लाईट-पाणी बिल, मुलांची फी आणि ऑनलाइन शॉपिंगमुळे बजेट पूर्णपणे कोलमडतं.

PREV
15
सर्वात आधी स्वतःला पैसे द्या

अनेकजण आधी खर्च करतात आणि मग बचतीचा विचार करतात. फायनान्शियल एक्सपर्ट्सच्या मते, हीच सर्वात मोठी चूक आहे. पगार आल्याआल्या किमान १०-२०% रक्कम दुसऱ्या सेव्हिंग अकाऊंटमध्ये किंवा गुंतवणुकीत टाका. समजा तुमचा पगार ५०,००० रुपये असेल, तर लगेच ५,००० ते १०,००० रुपये बाजूला काढा. 'जो पैसा नजरेआड, तो खर्चापासून दूर' हे लक्षात ठेवा.

25
50-30-20 चा नियम वापरा

हा एक सोपा बजेट फॉर्म्युला आहे, जो बहुतेक फायनान्शियल एक्सपर्ट्स सुचवतात. तुमच्या पगारातील ५०% रक्कम गरजेच्या खर्चासाठी (घर, किराणा, बिलं), ३०% लाईफस्टाईलसाठी (फिरणं आणि शॉपिंग) आणि २०% रक्कम बचतीसाठी वापरा. यामुळे तुमचा पैसा नेमका कुठे जास्त खर्च होतोय, हे स्पष्टपणे कळेल. फक्त एक महिना जरी तुम्ही हे करून बघितलं, तरी तुम्हाला फरक जाणवेल.

35
सबस्क्रिप्शन आणि EMI ची तपासणी करा

नेटफ्लिक्स (Netflix), ॲमेझॉन (Amazon), ॲप्स, म्युझिक, क्रेडिट कार्ड EMI यांसारखे छोटे-छोटे खर्च एकत्र येऊन मोठी रक्कम बनतात. दर ३ महिन्यांनी एक 'मनी चेक डे' ठरवा आणि तपासा की जे पैसे कट होत आहेत, ते खरंच गरजेचं आहे का? फक्त २-३ अनावश्यक सबस्क्रिप्शन्स बंद करूनही तुम्ही वर्षाला हजारो रुपये वाचवू शकता.

45
२४ तासांचा शॉपिंग नियम पाळा

कोणतीही अनावश्यक वस्तू खरेदी करण्यापूर्वी किमान २४ तास थांबा. अनेकदा जी वस्तू त्या क्षणी खूप गरजेची वाटते, ती दुसऱ्या दिवशी तितकी महत्त्वाची वाटत नाही. ही एक छोटीशी सवय तुमचे महिन्याला किमान ३,००० ते ५,००० रुपये वाचवू शकते.

55
इमर्जन्सी फंड तयार करा

अचानक आलेलं मेडिकल इमर्जन्सी, नोकरी जाणं किंवा एखादा मोठा खर्च अनेकदा आपलं बजेट पूर्णपणे बिघडवून टाकतो. त्यामुळे दर महिन्याला थोडे-थोडे पैसे जमवून किमान ३ महिन्यांच्या खर्चाएवढा इमर्जन्सी फंड तयार ठेवा. जेव्हा तुमच्याकडे असा बॅकअप असतो, तेव्हा कर्ज घेण्याची वेळ येत नाही आणि आर्थिक अडचणीही टळतात.

सूचना: हा लेख केवळ सामान्य आर्थिक माहिती आणि जागरुकता निर्माण करण्याच्या उद्देशाने तयार केला आहे. यात दिलेल्या टिप्स सामान्य परिस्थिती लक्षात घेऊन दिल्या आहेत. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक, बचत योजना किंवा आर्थिक निर्णय घेण्यापूर्वी तुमचं उत्पन्न, खर्च आणि जोखीम क्षमतेचं मूल्यांकन नक्की करा. आम्ही कोणत्याही विशिष्ट गुंतवणूक योजनेची, बँकेची, वित्तीय संस्थेची किंवा उत्पादनाची शिफारस करत नाही. कोणताही आर्थिक निर्णय घेण्यापूर्वी प्रमाणित आर्थिक सल्लागाराचा (Financial Advisor) सल्ला अवश्य घ्या.

Read more Photos on

Recommended Stories