१ डिसेंबरपासून देशात 'हे' ५ नियम बदलणार! तुमच्या खिशावर थेट परिणाम; वाचले नाहीत तर मोठे नुकसान होईल!

Published : Nov 30, 2025, 01:28 PM IST

Rule Change on 1 December : 1 डिसेंबरपासून देशभरात अनेक महत्त्वाचे नियम बदलणार आहेत, ज्यात एलपीजी सिलेंडरच्या दरातील बदल, आधारकार्ड ऑनलाइन अपडेट करण्याची सोपी प्रक्रिया आणि पेन्शनधारकांसाठी जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची अंतिम मुदत यांचा समावेश आहे. 

PREV
16
1 डिसेंबरपासून लागू होणार मोठे बदल

मुंबई : डिसेंबर महिना सुरू होताच देशभरात काही महत्त्वाचे नियम बदलणार आहेत. प्रत्येक महिन्यातील पहिल्या दिवशीप्रमाणेच, याही वेळेस काही आर्थिक आणि प्रशासकीय बदल थेट सामान्य नागरिकांवर परिणाम करणार आहेत. स्वयंपाकघरापासून पेन्शनधारकांपर्यंत 1 डिसेंबरपासून अनेक नवे नियम आणि दर लागू होणार आहेत.

26
1) एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत बदल

डिसेंबरची सुरुवात होताच पहिला मोठा बदल एलपीजी सिलेंडरच्या किमतींमध्ये दिसणार आहे. तेल कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या तारखेला घरगुती आणि व्यावसायिक सिलेंडरच्या दरांमध्ये बदल करतात.

नव्या दरांची घोषणा 1 डिसेंबरला होणार आहे.

नोव्हेंबरमध्ये 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरवर 6.50 रुपयांची कपात झाली होती.

14 किलोच्या घरगुती गॅसच्या दरात मात्र अनेक महिन्यांपासून कोणताही बदल नाही.

उद्यापासून एलपीजी महागणार की स्वस्त याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

36
2) आधारकार्ड अपडेट प्रक्रिया अधिक सोपी

आता आधारवरील नाव, पत्ता, जन्मतारीख किंवा मोबाईल नंबर यांसारखे वैयक्तिक तपशील पूर्णपणे ऑनलाइन अपडेट करता येणार आहेत.

नवीन प्रक्रियेनुसार,

पॅनकार्ड, पासपोर्टसारख्या सरकारी नोंदींच्या आधारे पडताळणी होईल.

नागरिकांना पोस्ट ऑफिस किंवा आधार केंद्रात जाण्याची गरज उरणार नाही.

या बदलामुळे लाखो लोकांना मोठी सोय होणार आहे. 

46
3) पेन्शन योजना बदलण्याची अंतिम संधी

युनिफाईड पेन्शन स्कीममध्ये जाण्याची आज 30 नोव्हेंबर ही शेवटची तारीख आहे. राष्ट्रीय पेन्शन सिस्टीम (NPS) मधून नव्या योजनेत स्थानांतर करू इच्छिणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी ही अंतिम मुदत आहे. केंद्राने यापूर्वी एकदा मुदत वाढविली होती.

आता पुन्हा वाढ मिळेल का?, अद्याप स्पष्ट नाही.

आजची तारीख चुकली तर नोकरदारांना पेन्शन योजना बदलण्याची संधी हातची जाऊ शकते. 

56
4) तात्काळ तिकीट बुकिंगमध्ये नवा नियम

रेल्वेत तात्काळ तिकीट बुक करणाऱ्यांसाठी मोठी माहिती!

1 डिसेंबर 2025 पासून

तात्काळ तिकीटासाठी OTP पडताळणी अनिवार्य होणार आहे.

प्रवाशांच्या मोबाईलवर पाठवलेल्या ओटीपीशिवाय तिकीट जारी केले जाणार नाही.

पश्चिम रेल्वेने हा निर्णय घेतला असून लांबपल्ल्याच्या प्रवासासाठी बुकिंग करताना हा नियम लक्षात ठेवणे आवश्यक आहे. 

66
5) जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची अंतिम तारीख

पेन्शनधारकांसाठी महत्त्वाची सूचना

जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची अखेरची तारीख 30 नोव्हेंबर आहे.

त्यामुळे 1 डिसेंबरपासून प्रमाणपत्र जमा करता येणार नाही.

वेळेत प्रमाणपत्र न भरल्यास पेन्शन थांबण्याची शक्यता असते.

RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...
Read more Photos on

Recommended Stories