HSRP Number Plate : हाय सिक्युरिटी नंबर प्लेट (HSRP) लावण्याची अंतिम मुदत 30 नोव्हेंबर 2025 आहे. ही मुदत न पाळल्यास वाहनधारकांना ₹10,000 पर्यंतचा मोठा दंड भरावा लागू शकतो, त्यामुळे संभाव्य दंड टाळण्यासाठी त्वरित नोंदणी करणे आवश्यक आहे.
हाय सिक्युरिटी नंबर प्लेट (HSRP) लावण्याची अंतिम मुदत आता डोक्यावर येऊन ठेपली आहे. 30 नोव्हेंबर 2025 हा अंतिम दिवस असून, अजूनही लाखो वाहनधारकांनी अर्ज केलेला नसल्याने त्यांना मोठ्या दंडाला सामोरे जावे लागू शकते.
26
अजूनही रजिस्ट्रेशन नाही? तर धोक्याची घंटी वाजली
मुंबईसह राज्यभरातील अनेक वाहनधारकांनी HSRP नंबर प्लेटसाठी अद्याप नोंदणी केलेली नाही. सरकारने आधीच तीनवेळा मुदतवाढ दिल्यानंतर ही चौथी आणि अत्यंत निर्णायक अंतिम तारीख जाहीर झाली आहे.
एप्रिल 2019 पूर्वीची सर्व वाहने – HSRP अनिवार्य
बुकिंग केलेल्या 56 हजार वाहनांवर प्लेट बसवण्याचे काम सुरू
अजूनही लाखो वाहनांनी अर्ज न केल्याचे समोर आले
36
दंड किती?, घाई करणं का गरजेचं?
HSRP नसेल तर दंडाची तरतूद अतिशय कठोर आहे.
रजिस्ट्रेशन केले पण प्लेट बसवली नाही - ₹1,000 दंड
रजिस्ट्रेशनच नाही - थेट ₹10,000 दंड
म्हणजेच आजच रजिस्ट्रेशन केल्यास तुम्ही ₹9,000 पर्यंत दंडापासून वाचू शकता.
आता पुन्हा 31 डिसेंबर 2025 पर्यंत वाढ दिली जाऊ शकते, अशी चर्चा आहे, परंतु सरकारकडून याबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही.
वाहनांची संख्या प्रचंड असल्याने सर्वांवर कारवाई करणे कठीण ठरणार आहे. नागरिकांचा अल्प प्रतिसाद आणि वाढता रोष पाहता मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे. मात्र खात्री नाही, म्हणून शेवटच्या क्षणावर अवलंबून राहू नये.
56
HSRP नंबर प्लेट का अनिवार्य?
HSRP म्हणजे उच्च सुरक्षा असलेली ॲल्युमिनियम नंबर प्लेट. यात
अशोक चक्र असलेला सुरक्षित होलोग्राम
लेझर-इन्कोडेड 9-अंकी युनिक ID
नॉन-रिमूव्हेबल स्नॅप लॉक
यामुळे वाहनांची चोरी, बनावट नंबर प्लेट वापर, छेडछाड यावर प्रभावी नियंत्रण मिळते, म्हणूनच सरकारने सर्व वाहनांसाठी HSRP अनिवार्य केली आहे.
66
उद्या उशीर होईल! आजच HSRP बुक करा
फक्त काही तास उरले आहेत. रजिस्ट्रेशन नसेल तर
₹10,000 दंड
वाहन तपासणीमध्ये अडचणी
आजच रजिस्ट्रेशन केल्यास दंडातून सुटका
सरकारकडून पुढील मुदतवाढीची घोषणा झालेली नाही, त्यामुळे ताबडतोब बुकिंग करणेच सुरक्षित.
Utility News (उपयुक्तता बातम्या): Check Latest उपयुक्तता बातम्या थेट in Marathi. Read वैयक्तिक कर्ज, बँकिंग टिप्स, गुंतवणूक, सोने आणि चांदीच्या किंमती बातम्या, ताज्या बातम्या at Asianet Marathi News .