Royal Enfield EV रॉयल एनफिल्डने आपली पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' ची डिलिव्हरी बंगळुरूमध्ये अधिकृतपणे सुरू केली आहे. कंपनीने ग्राहकांसाठी 'हब-अँड-स्पोक' सर्व्हिस नेटवर्क आणि बॅटरी-ॲज-ए-सर्व्हिस (BaaS) सारखे खास पर्यायही आणले आहेत.
रॉयल एनफिल्ड ईव्ही मार्केटमध्ये टप्प्याटप्प्याने विस्तार करण्याची योजना आखत आहे. या योजनेनुसार, कंपनीने बंगळूरुला पहिले मार्केट म्हणून निवडले आहे. त्यामुळे, देशात सर्वात आधी ही ई-बाईक मिळवण्याचा मान बंगळूरुमधील ग्राहकांना मिळाला आहे. बंगळूरुमध्ये यशस्वी झाल्यानंतर, कंपनी हे नेटवर्क देशातील इतर मोठ्या शहरांमध्येही विस्तारणार आहे.
26
टप्प्याटप्प्याने विस्तार करण्याची योजना: बंगळूरुला पहिले प्राधान्य
रॉयल एनफिल्ड ईव्ही मार्केटमध्ये टप्प्याटप्प्याने विस्तार करण्याची योजना आखत आहे. या योजनेनुसार, कंपनीने बंगळूरुला पहिले मार्केट म्हणून निवडले आहे. त्यामुळे, देशात सर्वात आधी ही ई-बाईक मिळवण्याचा मान बंगळूरुमधील ग्राहकांना मिळाला आहे. बंगळूरुमध्ये यशस्वी झाल्यानंतर, कंपनी हे नेटवर्क देशातील इतर मोठ्या शहरांमध्येही विस्तारणार आहे.
'Flying Flea C6' च्या मालकांना चांगली सर्व्हिस मिळावी, यासाठी कंपनीने बंगळुरूमध्ये 'हब-अँड-स्पोक' नेटवर्क सुरू केलं आहे. BTM लेआउटमध्ये एक मुख्य सर्व्हिस सेंटर (Hub) उघडलं आहे, जिथे बाईकच्या मोठ्या तांत्रिक दुरुस्तीचं काम केलं जाईल. शहरात इतर ठिकाणी छोटी सर्व्हिस सेंटर्स (Spokes) असतील, जिथे रोजची सर्व्हिसिंग होईल. याशिवाय, कंपनीने जुन्या पेट्रोल बाईक शोरूममध्ये 'शॉप-इन-शॉप' मॉडेल सुरू केलं आहे. जयनगरसारख्या ठिकाणी ग्राहक ही बाईक प्रत्यक्ष बघू शकतात. प्रत्येक बाईकसोबत 24x7 रोडसाईड असिस्टन्स (RSA) मोफत मिळेल.
किंमत आणि आकर्षक BaaS (बॅटरी-ॲज-ए-सर्व्हिस) पर्याय
बंगळूरुमधील ग्राहकांसाठी 'Flying Flea C6' बाईक दोन खरेदी पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. ही बाईक 'स्टॉर्म ब्लॅक' आणि 'फ्ली ग्रीन' या दोन रंगांमध्ये येते. तुम्ही बॅटरीसोबत पूर्ण बाईक खरेदी केल्यास, तिची एक्स-शोरूम किंमत २.७९ लाख रुपये आहे. दुसरा पर्याय 'बॅटरी-ॲज-ए-सर्व्हिस' (BaaS) आहे. यात बाईकची सुरुवातीची किंमत कमी होते. बॅटरीशिवाय बाईकची किंमत १.९९ लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे आणि बॅटरीसाठी तुम्हाला दरमहा वेगळे पैसे (सबस्क्रिप्शन) द्यावे लागतील.
56
पॉवरट्रेन, मायलेज आणि तांत्रिक वैशिष्ट्ये
'Flying Flea C6' फक्त स्टायलिश नाही, तर तिचा परफॉर्मन्सही दमदार आहे. यात ३.९१ kWh क्षमतेची बॅटरी आहे, जी एका चार्जमध्ये १५४ किलोमीटर (IDC रेंज) धावते. बाईकची मोटर १५.४ kW पॉवर आणि ६० Nm टॉर्क जनरेट करते. ही बाईक फक्त ३.७ सेकंदात ० ते ६० किमीचा वेग पकडते आणि तिचा टॉप स्पीड ११५ किमी/तास आहे. बाईकचं वजन फक्त १२४ किलो असून, शहरातील ट्रॅफिकमध्ये सहज चालवता यावी यासाठी १९-इंचाच्या चाकांसह ९०-सेक्शनचे अरुंद टायर दिले आहेत.
66
प्रीमियम फीचर्स
या ई-बाईकमध्ये अनेक प्रीमियम फीचर्स दिले आहेत. यात ३.५-इंचाचा आकर्षक कलर TFT डिस्प्ले, रायडरला हवी तशी ॲडजस्ट करता येणारी रिजनरेटिव्ह ब्रेकिंग सिस्टीम, ५ वेगवेगळे रायडिंग मोड्स, लीन-सेन्सिटिव्ह ट्रॅक्शन कंट्रोल आणि सुरक्षेसाठी ड्युअल-चॅनल ABS सिस्टीम आहे. रॉयल एनफिल्डने स्पष्ट केलं आहे की, त्यांचं ध्येय फक्त बाईक विकणं नाही, तर रायडर्सना प्रत्येक टप्प्यावर एक चांगला अनुभव आणि सपोर्ट देणं आहे.