25 हजारांच्या पगारातही 10 कोटींचा रिटायरमेंट फंड, वाचा गुंतवणूकीचे पर्याय

Published : Dec 30, 2024, 02:38 PM IST
Investment

सार

Retainment Fund Planning : 25 हजार रुपये पगार असणाऱ्या व्यक्तीही कोट्यावधींचा फंड भवितव्यासाठी तयार करू शकता. यासाठी गुंतवणूकीचे कोणते पर्याय आहेत याबद्दल जाणून घेऊया...

Retainment Fund Planning : प्रत्येकाला वाटते की, सेवानिवृत्तीनंतर आपल्याकडे पुढील आयुष्य जगण्यासाठी भरपूर पैसे असावेत. पण पैशांची योग्यवेळी बचत करणे फार फायदेशीर असते. अशातच तुम्हाला 25 हजार रुपये पगार असला तरीही भवितव्यासाठी कोट्यावधींचा रिटायरमेंट फंड तयार करू शकता. यासाठी 70:15:15 चा फॉम्यूला वापरावा लागले. या फॉर्म्युल्याच्या मदतीने आर्थिक स्थिरता आणि भवितव्य नक्की सुखात जगता येईल.

काय आहे 70:15:15 चा फॉम्यूला?

70:15:15 चा फॉम्यूल्यामध्ये एकूण उत्पन्नाच्या 70 टक्के हिस्सा आपल्या खर्चांसाठी जसे की, घरभाडे, राशन किंवा बिल यासाठी करावा. 15 टक्के आपत्कालीन फंड आणि 15 टक्के रक्कम आयपीएसमध्ये (IPS Investment) गुंतवू शकता. तर 25 हजारांच्या पगारातही 10 कोटींचा रियाटरमेंट फंड कसा तयार करू शकता हे जाणून घेऊया पुढे...

स्टेप-अप SIP चा पर्याय

स्टेप-अप एसआयपीच्या माध्यमातून प्रत्येक वर्षाला गुंतवणुकीच्या रक्कमेत वाढ करता येते. जर तुम्ही 25 वर्षांपर्यंत SIP अंतर्गत प्रत्येक वर्षी 10 टक्क्यांनी रक्केमत वाढू शकता. या योजनेअंतर्गत गुंतवणूक केलेल्या रक्कमेचे मूल्यही वाढले जाते. यामुळे लवकरात लवकर गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला जातो.

असा तयार होईल 10 कोटींचा फंड

एसआयपीची सुरुवात 3750 रुपये प्रति महिन्यापासून करू शकता. यामध्ये प्रत्येक वर्षाला 10 टक्क्यांनी वाढ करत 25 वर्षांपर्यंत गुंतवणूक करा. असे केल्यास 12 टक्के वार्षिक सरासरी रिटर्न मिळतात. अशाप्रकारे तुमच्याकडे 10.68 कोटी रुपयांची रक्कम जमा होऊ शकते. एकूण गुंतवणूक 2.95 कोटी रुपये असून त्यावर रिटर्न 7.73 कोटी रुपये होईल. जर रिटर्न 12 टक्क्यांहून अधिक मिळाल्यास गुंतवणुक आणि रिटर्नमध्ये अधिक फायदा होईल.

आणखी वाचा : 

सोन्याचे दर: प्रमुख शहरांमध्ये आजचे 24 कॅरेट सोन्याचे दर घ्या जाणून

नवीन वर्षात भारत सरकारने नियमांमध्ये केला बदल, कोणते आहेत नियम?

PREV

Recommended Stories

Mahavitaran Bharti 2025 : तरुणांसाठी सुवर्णसंधी! महावितरणमध्ये 300 पदांवर मेगाभरती, दीड लाखांपर्यंत पगार; अर्ज कसा कराल?
हिवाळ्यात त्वचा कोरडी पडल्यास काय करावं, या पर्यायांनी होईल तजेलदार