
Relationship Advice: आपल्याकडे अरेंज मॅरेजमध्ये मुलगी सासरी नांदायला जाते, म्हणजे सासू-सासऱ्यांसोबतच राहते. अनेकदा तर नवरा नोकरीसाठी दुसऱ्या शहरात असतो आणि बायको मात्र सासरीच असते. पण खरंतर असं व्हायला नको. रिलेशनशिप काउन्सिलर आणि लेखक अजय के. पांडेय यांचं म्हणणं आहे की, लग्नाच्या सुरुवातीची ५ वर्षं नवरा-बायकोने एकत्र राहणं खूप गरजेचं आहे. नातं घट्ट करण्यासाठी त्यांना थोडा पर्सनल स्पेस मिळायला हवा. त्यांच्या मते, या काळात आई-वडिलांपासून वेगळं राहिल्याने नातं अधिक चांगलं होण्यास मदत होते. यासाठी त्यांनी ७ महत्त्वाची कारणं सांगितली आहेत:
रिलेशनशिप कोचने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर लिहिलं आहे की, तुमच्या बायकोने तुमच्याशी लग्न केलं आहे, संपूर्ण कुटुंबाशी नाही. त्यामुळे तिच्या भावना, स्वप्नं आणि गरजांना प्राधान्य देणं महत्त्वाचं आहे. तुम्ही नेहमी इतरांना खूश करण्याच्या प्रयत्नात राहिलात, तर तुमच्या बायकोला दुर्लक्षित झाल्यासारखं वाटू शकतं.
जर एखाद्या व्यक्तीला प्रत्येक वेळी टोकलं गेलं किंवा तिच्यावर जास्त नियंत्रण ठेवलं गेलं, तर तिचा आत्मविश्वास कमी होऊ लागतो. बायकोला असं वातावरण मिळायला हवं, जिथे ती मोकळेपणाने आपलं मत मांडू शकेल.
एकत्र कुटुंबात अनेकदा रोजची कामं आणि रितीरिवाजांचं ओझं इतकं वाढतं की, नवरा-बायकोमधला रोमान्स कमी होऊ लागतो. त्यामुळे नात्यात क्वालिटी टाइम घालवणं गरजेचं आहे.
प्रत्येक व्यक्तीला आपल्या आवडीनुसार निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य हवं असतं. जर प्रत्येक लहान-सहान गोष्टीवरून प्रश्न विचारले गेले, तर व्यक्तीला घुसमटल्यासारखं वाटू लागतं.
नवरा-बायकोमध्ये भावनिक आणि शारीरिक जवळीक निर्माण होण्यासाठी प्रायव्हेट टाइम खूप महत्त्वाचा असतो. जेव्हा दोघांना एकत्र वेळ मिळतो, तेव्हा नात्यात समजूतदारपणा आणि आपुलकी वाढते.
हे पण वाचा: धक्कादायक कहाणी: ३६ किलो वजन कमी करताच बदलला नवरा, आता पत्नीला हवाय घटस्फोट
अजय यांच्या मते, गरजेपेक्षा जास्त हस्तक्षेप किंवा प्रत्येक वेळी एकत्र राहण्याचा दबाव नात्यात घुसमट निर्माण करू शकतो. थोडं स्वातंत्र्य आणि वैयक्तिक स्पेस मिळाल्यास नातं अधिक मजबूत होतं.
काही काळ वेगळं राहिल्यामुळे जोडपं एकमेकांना अधिक चांगल्या प्रकारे समजू शकतं. यामुळे जबाबदाऱ्या वाटून घेण्यास आणि नातं मजबूत करण्यास मदत मिळते.