
Realme 16T Launched : स्मार्टफोन ब्रँड Realme ने पुन्हा एकदा मार्केटमध्ये धमाका करण्याची तयारी केली आहे. कंपनीने आपला नवीन Realme 16T स्मार्टफोन भारतात लाँच केला आहे. हा फोन त्याच्या दमदार बॅटरी, हाय रिफ्रेश-रेट डिस्प्ले आणि AI कॅमेरा फीचर्समुळे सध्या जोरदार चर्चेत आहे. या फोनची सर्वात मोठी खासियत म्हणजे याची जबरदस्त बॅटरी लाईफ आणि मजबूत बिल्ड क्वालिटी.
Realme 16T भारतात तीन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. याच्या 6GB रॅम + 128GB स्टोरेज मॉडेलची किंमत २९,९९९ रुपये आहे. तर 8GB + 128GB मॉडेलसाठी तुम्हाला ३१,९९९ रुपये मोजावे लागतील. याचं टॉप-एंड मॉडेल, म्हणजे 8GB + 256GB व्हेरिएंट ३४,९९९ रुपयांना मिळेल. हा फोन स्टारलाईट ब्लॅक, स्टारलाईट ब्लू आणि स्टारलाईट रेड अशा तीन रंगांमध्ये उपलब्ध असेल. तुम्ही हा फोन फ्लिपकार्ट आणि रियलमीच्या अधिकृत वेबसाइटवरून खरेदी करू शकता.
लाँच ऑफर म्हणून, कंपनीने क्रेडिट कार्ड EMI व्यवहारांवर ३,००० रुपयांपर्यंत इन्स्टंट डिस्काउंट जाहीर केला आहे. तसेच, निवडक बँक UPI व्यवहारांवर २,००० रुपयांपर्यंत सूट मिळेल. याशिवाय, १२ महिन्यांपर्यंत नो-कॉस्ट EMI ची सुविधा देखील आहे. जुन्या Realme युजर्सना १,००० रुपयांचा अतिरिक्त फायदा मिळेल. याची प्री-बुकिंग २६ मे पर्यंत सुरू असून, पहिला सेल २७ मे रोजी दुपारी १२ वाजता सुरू होईल.
Realme 16T च्या प्रमुख वैशिष्ट्यांपैकी एक म्हणजे याचा ६.८-इंचाचा मोठा LCD डिस्प्ले. कंपनीचा दावा आहे की, 144Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करणारी ही स्क्रीन गेमिंग आणि व्हिडिओ पाहण्यासाठी एक उत्तम अनुभव देईल. 1,200 निट्सच्या पीक ब्राइटनेसमुळे, भर सूर्यप्रकाशातही स्क्रीन स्पष्ट दिसते. यात आय प्रोटेक्शन मोड, डार्क मोड आणि ऑटो ब्राइटनेस ॲडजस्टमेंट सारखे फीचर्सही आहेत.
Realme 16T मध्ये MediaTek Dimensity 6300 प्रोसेसर दिला आहे. फोनमध्ये 8GB पर्यंत LPDDR4X रॅम आणि 256GB पर्यंत UFS 2.2 स्टोरेज आहे. हा फोन Android 16 वर आधारित Realme UI 7 वर चालतो. फोनमध्ये स्प्लिट स्क्रीन, फ्लोटिंग विंडो, स्क्रीन रेकॉर्डिंग आणि अगदी iOS फाईल शेअरिंगसारखे अनेक सॉफ्टवेअर फीचर्सही मिळतात.
फोटोग्राफीसाठी, फोनमध्ये ५०-मेगापिक्सलचा Sony IMX852 मुख्य कॅमेरा आहे. याशिवाय, २-मेगापिक्सलचा मोनोक्रोम सेन्सरही दिला आहे. AI पोर्ट्रेट ग्लो आणि AI इन्स्टंट क्लिप सारखे AI-आधारित फीचर्स फोटोंचे रंग आणि डायनॅमिक रेंज सुधारण्यास मदत करतात. सेल्फीसाठी १६-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. एका खास सेल्फी मिरर सिस्टीममुळे तुम्ही मागच्या कॅमेऱ्यानेही उत्तम दर्जाचे सेल्फी घेऊ शकता.
या फोनची सर्वात मोठी खासियत म्हणजे याची 8,000mAh क्षमतेची बॅटरी. कंपनीचा दावा आहे की, 45W SuperVOOC फास्ट चार्जिंगला सपोर्ट करणारा हा फोन एका पूर्ण चार्जवर तीन दिवस टिकू शकतो. फोनमध्ये बायपास चार्जिंग आणि रिव्हर्स वायर्ड चार्जिंगचाही सपोर्ट आहे.
IP69 वॉटर आणि डस्ट रेझिस्टन्स, मिलिटरी-ग्रेड शॉक प्रोटेक्शन, पांडा ग्लास प्रोटेक्शन आणि वेफर चेंबर कूलिंग सिस्टीम यांसारखी वैशिष्ट्ये फोनच्या दीर्घकाळ वापरासाठी मदत करतील. यात 5G, ब्लूटूथ 5.3, हाय-रेस ऑडिओ आणि विविध प्रीमियम ऑडिओ कोडेक्ससाठी सपोर्ट देखील आहे. टेक विश्वातील सुरुवातीच्या प्रतिक्रियांनुसार, ज्या युजर्सना मोठी बॅटरी, पॉवरफुल कॅमेरा आणि मजबूत डिझाइनचं कॉम्बिनेशन हवं आहे, त्यांच्यासाठी Realme 16T एक उत्तम पर्याय ठरू शकतो.