कर्ज खाती बंद करण्याबाबत आणि NOC देण्याबाबत भारतीय रिझर्व्ह बँकेने कडक नियम लागू केले आहेत. त्यानुसार, ग्राहकाने कर्ज पूर्णपणे फेडल्यानंतर ३० दिवसांच्या आत बँकेने NOC देणे बंधनकारक आहे. जर ३० दिवसांच्या आत देण्यास बँक अपयशी ठरली, तर ३१ व्या दिवसापासून उशीर होणाऱ्या प्रत्येक दिवसासाठी बँकेला ग्राहकाला ५,००० रुपये दंड द्यावा लागेल.
ग्राहकांनी पार पाडायची महत्त्वाची कर्तव्ये
कर्ज पूर्णपणे फेडल्यानंतर, ३० दिवसांच्या आत बँकेकडून NOC प्रमाणपत्र विसरता कामा नये.
वाहन कर्ज घेतले असल्यास, NOC मिळताच RTO कार्यालयात जाऊन RC पुस्तकातील बँकेचा अधिकार रद्द करावा.
घर किंवा मालमत्तेचे कर्ज घेतले असल्यास, उप-निबंधक कार्यालयाद्वारे मालमत्तेवरील बँकेचा अधिकार रीतसर काढून टाकावा.
कर्ज संपल्यानंतर सुमारे ४५ ते ६० दिवसांच्या आत, तुमच्या सिबिल रिपोर्टमध्ये ते कर्ज खाते 'Closed' म्हणून नोंदवले गेले आहे का, हे नक्की तपासावे.