RBI Recruitment : रिझर्व्ह बँकेत नोकरीची मोठी संधी, असा करा अर्ज; वाचा संपूर्ण प्रक्रिया

Published : Sep 08, 2026, 01:58 PM IST
Reserve Bank of India

सार

सरकारी नोकरी शोधणाऱ्यांसाठी एक चांगली बातमी आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये (RBI) भरती निघाली आहे. या पदासाठी अर्ज कसा करायचा आणि पात्रता काय आहे, याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

मुंबई : सणासुदीच्या काळात सरकारी नोकरी शोधणाऱ्यांसाठी एक मोठी संधी आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये (RBI) भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. बँकेने याबद्दल एक जाहिरात प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार, इच्छुक उमेदवार रिझर्व्ह बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकतात. विशेष म्हणजे, निवड झालेल्या उमेदवाराला गोव्यात काम करावं लागेल.

कामाचं स्वरूप आणि पात्रता काय?

जाहिरातीनुसार, हे पद कंत्राटी पद्धतीचं (contract basis) असेल. सुरुवातीला तीन वर्षांसाठी नियुक्ती केली जाईल आणि गरजेनुसार नंतर हा कालावधी वाढवला जाऊ शकतो. रिझर्व्ह बँकेत 'मेडिकल कन्सल्टंट' पदासाठी ही भरती आहे. एकूण एका जागेसाठी ही भरती प्रक्रिया होत आहे. निवड झालेल्या उमेदवाराला दर तासाला १ हजार रुपये मानधन दिलं जाईल. अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाने मान्यता दिलेल्या संस्थेतून MBBS पदवी असणं आवश्यक आहे. जर उमेदवाराने जनरल मेडिसिनमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केलं असेल, तरीही तो अर्ज करू शकतो. मात्र, संबंधित क्षेत्रात किमान दोन वर्षांचा कामाचा अनुभव असणं गरजेचं आहे. इतर पात्रतेच्या अटींसाठी मूळ जाहिरात पाहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख:-

इच्छुक उमेदवार रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन पद्धतीने सर्व कागदपत्रं सादर करून अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ सप्टेंबर आहे. अधिक माहितीसाठी बँकेची मूळ जाहिरात नक्की पाहा.

याशिवाय, बँक ऑफ बडोदाची उपकंपनी असलेल्या बडोदा ग्लोबल शेअर्ड सर्व्हिसेस लिमिटेडने (BGSSL) सुद्धा विविध पदांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती प्रक्रियेद्वारे देशभरात एकूण २,०४९ पदं भरली जाणार आहेत. यामध्ये कलेक्शन, डिजिटल बँकिंग, ग्लोबल ट्रेड सर्व्हिसेस, रिटेल सेल्स, ह्युमन रिसोर्सेस, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, फील्ड कलेक्शन, डिजिटल ऑनबोर्डिंग आणि आधार ऑपरेशन्स यांसारख्या विभागांचा समावेश आहे. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया १ सप्टेंबरपासून सुरू झाली आहे.

खालील पदांवर होणार भरती:

• ॲप्रेंटिस (टेली कॉलिंग) - १५० पदं

• टेली कलेक्शन एजंट (कर्ज वसुली एजंट) - १०० पदं

अधिक बातम्यांसाठी, एशियानेट न्यूज मराठीच्या व्हॉट्सॲप चॅनेलला फॉलो करा, येथे क्लिक करा.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Economic Crisis : आर्थिक संकटातही राहायचंय सेफ? हे ४ गोल्डन रूल्स तुमच्यासाठीच आहेत!
Viral Video : 7 दिवसांत 4.5 लाखांची कमाई; दिल्लीच्या मेकअप आर्टिस्टचा व्हिडिओ व्हायरल