100, 200 रुपयांच्या नोटांबाबत RBI चा मोठा निर्णय, बॅंकांना चांगलेच फटकारले

Published : Aug 26, 2025, 02:01 PM IST

नवी दिल्ली- रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने एक नवीन आदेश जारी केला आहे. हा आदेश १०० आणि २०० रुपयांच्या नोटांच्या बाबतीत आहे. तुम्हाला या नोटा हव्या असतील तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.

PREV
15
एटीएममध्ये १०० आणि २०० रुपयांच्या नोटा ठेवणे बंधनकारक

भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) नवा आदेश जारी करत सर्व बँकांना एटीएममध्ये आता १०० आणि २०० रुपयांच्या नोटा अनिवार्यपणे उपलब्ध करून द्याव्यात असे निर्देश दिले आहेत. यासाठी बँकांना कोणतेही विशेष बदल करण्याची गरज नाही. आधीपासूनच अनेक एटीएममध्ये या नोटा ठेवण्याची सोय असल्याचेही आरबीआयने स्पष्ट केले आहे.

25
एटीएममधील सुविधा

आता देशभरातील सर्व बँका तसेच व्हाईट लेबल एटीएम ऑपरेटर यांना त्यांच्या एटीएममध्ये किमान एका कॅसेटमधून १०० आणि २०० रुपयांच्या नोटा देणे बंधनकारक केले आहे. यामुळे ग्राहकांना छोट्या नोटा सहज उपलब्ध होतील.

35
१०० रुपयांच्या नोटा : टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी
  • ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत देशातील किमान ७५% एटीएममध्ये १०० रुपयांच्या नोटा असाव्यात.
  • ३१ मार्च २०२६ पर्यंत हे प्रमाण ९०% एटीएमपर्यंत वाढवण्याचे लक्ष्य ठेवले आहे.
  • २०० रुपयांच्या नोटा ठेवण्यासाठी अतिरिक्त खर्च नाही
45
२०० रुपयांच्या नोटा

आरबीआयने स्पष्ट केले आहे की, बँकांना नवे एटीएम मशीन खरेदी करण्याची गरज नाही. विद्यमान एटीएममध्ये थोड्या सुधारणा केल्या तरी २०० रुपयांच्या नोटा सहज उपलब्ध होतील. अनेकदा एटीएम कॅसेट रिकामे ठेवले जातात किंवा पुरेशा नोटा भरल्या जात नाहीत, हे टाळण्यासाठीही रिझर्व्ह बँकेने विशेष भर दिला आहे.

55
२०० रुपयांच्या नोटा

सध्याच्या एटीएममध्ये काही बदल करून २०० रुपयांच्या नोटा उपलब्ध होतील, अशी व्यवस्था करण्यास सांगितले आहे. असे न केल्यास बॅंकांवर आवश्यक कारवाई केली जाईल, असेही आरबीआयने म्हटले आहे.

Read more Photos on

Recommended Stories