Railway Ticket: भारतीय पोस्ट विभाग आणि रेल्वेने मिळून प्रवाशांना पोस्ट ऑफिसमधून रेल्वे तिकीट बुक करण्याची सुविधा सुरू केली. पुणे जिल्ह्यात सुरू झालेल्या या सेवेमुळे प्रवाशांना स्टेशनवरील रांगेचा त्रास टाळून जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये तिकीट काढता येणारय.
पुणे: रेल्वे प्रवाशांसाठी एक दिलासा देणारी बातमी आहे. आता रेल्वेचं तिकीट मिळवण्यासाठी स्टेशनवर रांगेत उभं राहायचं त्रासदायक काम नाही, आणि ऑनलाइन बुकिंगसाठी इंटरनेटची झगमगही नाही! भारतीय पोस्ट विभागाने रेल्वेसोबत हातमिळवणी करून प्रवाशांना थेट पोस्ट ऑफिसमधून रेल्वे तिकीट बुक करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
26
पुणे जिल्ह्यातील अनेक पोस्ट कार्यालयांमध्ये ही सेवा सुरू
ही सोय सध्या पुणे जिल्ह्यातील अनेक पोस्ट कार्यालयांमध्ये सुरू करण्यात आली असून, लवकरच इतर भागातही ती सुरू होणार आहे. त्यामुळे ग्रामीण आणि निमशहरी भागातील प्रवाशांना रेल्वे स्टेशनपर्यंत जाण्याची गरज राहणार नाही आता तिकीट मिळणार थेट आपल्या जवळच्या पोस्ट ऑफिसमधून!
36
तिकीट बुकिंगची सोपी प्रक्रिया
पोस्ट ऑफिसमध्ये रेल्वेच्या ‘पॅसेंजर रिझर्वेशन सिस्टम’ (PRS) द्वारे प्रवाशांना सहज तिकीट बुक करता येईल. प्रवाशांनी केवळ आपलं गंतव्य, प्रवासाची तारीख आणि वर्ग सांगायचा आहे. पोस्ट ऑफिसमधील प्रशिक्षित कर्मचारी संगणकाद्वारे आरक्षण करून तिकीट तत्काळ देतील. तसंच, तिकीट रद्द करणे, बदल करणे, चौकशी करणे यांसारख्या सर्व सुविधा इथेच मिळतील म्हणजे एकाच ठिकाणी सर्व सेवा!
पूर्वी ग्रामीण भागातील प्रवाशांना तिकीट मिळवण्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी किंवा जवळच्या रेल्वे स्थानकावर जावं लागायचं. वेळ, प्रवासाचा खर्च आणि त्रास हे सगळं आता संपणार आहे. पोस्ट ऑफिसमध्येच ही सुविधा मिळाल्याने ग्रामीण भागातील नागरिकांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचणार आहेत.
56
२४ तास बुकिंग सेवा, रात्रीसुद्धा मिळेल तिकीट!
काही निवडक पोस्ट कार्यालयांत २४ तास बुकिंगची सुविधा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांना तातडीच्या प्रवासासाठीही कुठल्याही वेळी तिकीट मिळू शकतं. ही योजना रेल्वे स्टेशनवरील गर्दी कमी करण्यास आणि प्रवाशांना घराजवळच आरक्षणाची सोय देण्यासाठी खास उपयुक्त ठरणार आहे.
66
रेल्वे प्रवास आता अधिक सोपा, जलद आणि सुरक्षित
रेल्वे प्रशासन आणि पोस्ट विभागाच्या संयुक्त प्रयत्नांतून सुरू झालेली ही नवी सेवा प्रवाशांसाठी खरोखरच लाभदायक आहे. आता प्रवासाचं नियोजन अधिक सोयीस्कर, वेगवान आणि सुरक्षित होणार आहे. कारण रेल्वे तिकीट मिळेल थेट आपल्या पोस्ट ऑफिसमध्येच!