पुणे रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी! १० दिवसांचा ‘मेगाब्लॉक’; अमरावती-नागपूरसह ११ गाड्या रद्द

Published : Jan 10, 2026, 10:18 PM IST

दौंड-मनमाड मार्गावरील दुहेरीकरण आणि तांत्रिक कामासाठी रेल्वे प्रशासनाने १५ ते २५ जानेवारी २०२६ दरम्यान १० दिवसांचा मेगाब्लॉक जाहीर केला आहे. या काळात पुणे विभागातील अनेक महत्त्वाच्या गाड्या रद्द करण्यात आल्या असून, काही गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले.

PREV
16
पुणे रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी! १० दिवसांचा ‘मेगाब्लॉक’

पुणे : पुणे-दौंड दरम्यान प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना आहे. रेल्वे प्रशासनाकडून दौंड-मनमाड मार्गावर मोठ्या तांत्रिक कामासाठी १५ ते २५ जानेवारी २०२६ दरम्यान १० दिवसांचा ‘मेगाब्लॉक’ जाहीर करण्यात आला आहे. या कालावधीत पुणे विभागातील अनेक महत्त्वाच्या गाड्यांवर मोठा परिणाम होणार आहे.

26
मेगाब्लॉकचे कारण काय?

दौंड ते काष्टी दरम्यान रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण तसेच प्री-नॉन-इंटरलॉकिंग कामासाठी हा पॉवर ब्लॉक घेण्यात येत आहे. त्यामुळे पुणे-सोलापूर, पुणे-अमरावती यांसारख्या प्रमुख मार्गांवरील रेल्वे वाहतूक विस्कळीत होणार आहे. 

36
२३ ते २६ जानेवारीदरम्यान रद्द होणाऱ्या ११ महत्त्वाच्या गाड्या

या मेगाब्लॉकमुळे खालील रेल्वे गाड्या पूर्णपणे रद्द करण्यात आल्या आहेत.

पुणे-अमरावती एक्स्प्रेस (11025/11026)

अमरावती-पुणे एक्स्प्रेस (12119)

पुणे-सोलापूर एक्स्प्रेस (12169/12170)

सोलापूर-पुणे इंटरसिटी (12157/12158)

पुणे-नागपूर गरीब रथ (12113/12114)

अजनी-पुणे एक्स्प्रेस (12120)

पुणे-नांदेड एक्स्प्रेस (17629/17630)

पुणे-सोलापूर डेमू (11417/11418)

पुणे-दौंड डेमू (71401/71402)

निजामाबाद-पुणे एक्स्प्रेस 

46
काही गाड्यांचे मार्ग बदलले

मेगाब्लॉकच्या कालावधीत काही लांब पल्ल्याच्या गाड्या वळण मार्गाने धावणार आहेत.

यशवंतपूर-चंदीगड, जम्मू तवी-पुणे, हजरत निजामुद्दीन-वास्को-द-गामा

मनमाड-इगतपुरी-कल्याण-पनवेल-लोणावळा मार्गे पुणे

सातारा-दादर एक्स्प्रेस

जेजुरी मार्गे

तिरुवनंतपुरम-CSMT एक्स्प्रेस

कुर्डुवाडी-मिरज मार्गे 

56
‘शॉर्ट टर्मिनेशन’मुळे बदललेले थांबे

प्रवाशांची गैरसोय कमी करण्यासाठी काही गाड्यांचे मार्ग अंशतः बदलण्यात आले आहेत.

इंदूर-दौंड आणि ग्वाल्हेर-दौंड एक्स्प्रेस

दौंडऐवजी खडकी स्थानकावर समाप्त

दौंड-इंदूर एक्स्प्रेस

२४ व २५ जानेवारीला दौंडऐवजी पुण्याहून सुटणार 

66
रेल्वे प्रशासनाचे आवाहन

प्रवाशांनी प्रवासाला निघण्यापूर्वी रेल्वेचे अधिकृत वेळापत्रक आणि अपडेट्स तपासावेत, असे आवाहन रेल्वे विभागाने केले आहे, जेणेकरून अचानक होणाऱ्या बदलांमुळे होणारी गैरसोय टाळता येईल.

RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...
Read more Photos on

Recommended Stories