Pune Job Fair 2026: पुण्यात नोकरीची मोठी संधी! १९००+ जागांसाठी थेट मुलाखती; १० वी पास ते पदवीधरांना सुवर्णसंधी, वाचा कुठे व कधी?

Published : Mar 14, 2026, 05:37 PM IST

Pune Job Fair 2026: पुण्यात जिल्हा कौशल्य विकास केंद्र आणि एशियन कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने 'पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा' आयोजित करण्यात आलाय. या मेळाव्यात २४ हून अधिक नामांकित कंपन्या १९००+ पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती करणार आहेत. 

PREV
15
पुण्यात नोकरीची मोठी संधी! १९००+ जागांसाठी थेट मुलाखती

पुणे: पुण्यातील नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे! जिल्हा कौशल्य विकास केंद्र आणि एशियन कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्स यांच्या संयुक्त विद्यमाने 'पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा' आयोजित करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या मेळाव्यात नामांकित कंपन्यांकडून तब्बल १९०० पेक्षा जास्त रिक्त पदांची भरती केली जाणार आहे. 

25
महत्त्वाची माहिती एका दृष्टिक्षेपात

मेळाव्याची तारीख: १७ मार्च २०२६

वेळ: सकाळी १०:०० वाजता

ठिकाण: एशियन कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्स, पारी कंपनी चौक, नऱ्हे–धायरी रोड, पुणे.

सहभागी कंपन्या: जिल्ह्यातील नामांकित २४ हून अधिक कंपन्यांचा सहभाग. 

35
पात्रता आणि पदे

या मेळाव्यात विविध क्षेत्रांतील रोजगाराच्या संधी उपलब्ध असून शैक्षणिक पात्रतेनुसार खालील उमेदवार अर्ज करू शकतात.

१० वी आणि १२ वी उत्तीर्ण

डिप्लोमा धारक

कोणत्याही शाखेचे पदवीधर (Graduates) 

45
अर्ज प्रक्रिया आणि तयारी कशी करावी?

ऑनलाईन नोंदणी: इच्छुक उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळ www.rojgar.mahaswayam.gov.in वर जाऊन आपली नोंदणी पूर्ण करावी.

थेट मुलाखत: या मेळाव्यात खासगी कंपन्यांकडून उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेतल्या जातील.

कागदपत्रे: मुलाखतीसाठी येताना शैक्षणिक प्रमाणपत्रांच्या छायांकित प्रती (Zerox), आधार कार्ड आणि स्वतःचा अद्ययावत बायोडाटा (Resume) सोबत ठेवावा. 

55
अधिक माहितीसाठी संपर्क

काही शंका असल्यास उमेदवार जिल्हा कौशल्य विकास कार्यालय (रास्ता पेठ, पुणे) येथे प्रत्यक्ष भेट देऊ शकतात किंवा ०२०-२६१३३६०६ या क्रमांकावर संपर्क साधू शकतात.

RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...
Read more Photos on

Recommended Stories