कुंभबद्दल नागरिकांमध्ये फार मोठा उत्साह दिसून येतो. वर्ष 2013 नंतर पुन्हा एकदा वर्ष 2025 मध्ये प्रयागराजमध्ये पूर्ण कुंभचे आयोजन करण्यात येणार आहे. अशातच जाणून घ्या मुंबई ते प्रयागराजला पोहोचण्यासाठीच्या काही पर्यायी मार्गांबद्दल सविस्तर...
Prayagraj MahaKumbh 2025 : आस्थेचा महासंगम असणाऱ्या कुंभमेळ्यासाठी हजारोंची गर्दी होते. यावेळीचा उत्साह पाहण्यासारखा असतो. येत्या 13 जानेवारीपासून पूर्ण कुंभाची सुरुवात प्रयागराज येथे होणार आहे. कुंभात जाऊन स्नान करणे म्हणजे स्वत:ला भाग्यवान समजल्यासारखे असते असे सनातन धर्म मानणाऱ्यांना वाटतो. कुंभासाठी देशासह जगाच्या कानाकोपऱ्यातून लोक येतात. अशातच तुम्ही मुंबईत राहणारे असाल तर येणाऱ्या कुंभसाठी प्रयागराजला कसे पोहोचायचे आणि त्याचे पर्यायी मार्ग काय आहेत याबद्दल जाणून घेऊया...
पौष पौर्णिमेसह 13 जानेवारी 2025 पासून कुंभाची सुरुवात होणार असून 26 फेब्रुवारी म्हणजेच महाशिवरात्रीचा कुंभ समाप्त होणार आहे. अशातच कुंभसाठी मुंबईहून प्रयागराजला जायते असल्यास काही पर्याय आहेत. खरंतर, मुंबई ते प्रयागराजमधील अंतर एक हजार चारशे किलोमीटरचे आहे. अशातच बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या माध्यमातून 22 ते 23 तास प्रयागराजचा पोहोचण्यासाठी लागतात.
मुंबई ते प्रयागराजच्या दरम्यान काही ट्रेन चालवल्या जातत. यामध्ये काही दररोज तर काही ट्रेन मर्यादित दिवसांनुसार धावतात. यामुळे तुम्ही तुमची तारीख आणि वेळ पाहून ट्रेनचे तिकीट बुकिंग करू शकता.
कमीत कमी वेळात मुंबईहून प्रयागराजला पोहोचता येते. यासाठी केवळ 3 तासांचा वेळ लागतो. काही फ्लाइट थेट प्रयागराज तर काही मध्येच बदलाव्या लागतात. यामुळे फ्लाइटच्या तिकिटांचे दर बदलले जातात.
मुंबई ते प्रयागराजमधील अंतर फार अधिक आहे. यामुळे सार्वजनिक वाहतूकीचा पर्याय उपलब्ध नाही. तुम्ही खासगी वाहनाने प्रयागराजला पोहोचू शकता.
कुंभला जाण्यासाठी प्रयागराजमध्ये येण्यापूर्वी स्वत:चे रजिस्ट्रेशन करावे. हॉटेलसाठी शक्य असल्यास ऑनलाइन बुकिंग करावे. याशिवाय राहण्यासाठी बजेट फ्रेंडली ऑप्शन धर्मशाला आहे. कुंभसाठी खूप गर्दी होत असल्याने सामासह सोबत आलेल्या व्यक्तींची काळजी घ्या. स्वत:सोबत लहान फर्स्ट एड बॉक्स ठेवा. सर्वाधिक महत्वाचे म्हणजे अधिकचे पैसे सोबत ठेवा.
आणखी वाचा :