या योजनेत एखाद्याने १ लाख रुपये एकदाच गुंतवले, तर निवडलेल्या कालावधीनुसार मुदतीअंती मिळणाऱ्या मुद्दल आणि व्याजाचं संपूर्ण कॅल्क्युलेशन असं आहे:
१ वर्षाची गुंतवणूक: १ लाखाची गुंतवणूक १ वर्षासाठी केल्यास, ६.९% व्याजदरानुसार केवळ ७,०८१ रुपये व्याज मिळेल. मुदतीअंती एकूण १,०७,०८१ रुपये मिळतील.
२ वर्षांची गुंतवणूक: २ वर्षांसाठी पैसे ठेवल्यास ७% व्याजदरानुसार एकूण व्याज १४,८८८ रुपये होईल. मुदतीअंती गुंतवणूकदाराला १,१४,८८८ रुपये मिळतील.
३ वर्षांची गुंतवणूक: ३ वर्षांच्या डिपॉझिटसाठी ७.१% व्याज दिलं जातं. यात व्याजापोटी २३,५०८ रुपये मिळतील. परिणामी, ३ वर्षांनंतर मॅच्युरिटी रक्कम १,२३,५०८ रुपये असेल.
५ वर्षांची गुंतवणूक आणि टॅक्स बेनिफिट: ५ वर्षांच्या डिपॉझिटवर या योजनेत सर्वाधिक ७.५% व्याज मिळतं. या ५ वर्षांत जमा होणारी एकूण व्याजाची रक्कम ४४,९९५ रुपये असते. त्यानुसार, मुदतीअंती गुंतवणूकदाराला एकूण १,४४,९९५ रुपये मिळतील. शिवाय, इन्कम टॅक्सच्या कलम 80C अंतर्गत ५ वर्षांच्या डिपॉझिटवर टॅक्स सवलत मिळते. मात्र, मिळणाऱ्या व्याजावर लागू होणारा कर भरावा लागू शकतो.