पीएम किसान योजना म्हणजे काय?
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-KISAN) ही भारत सरकारची एक केंद्रीय योजना आहे. या योजनेअंतर्गत, पात्र लघु आणि सीमांत शेतकऱ्यांना दरवर्षी ₹6,000 ची आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम तीन समान हप्त्यांमध्ये थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये ट्रान्सफर केली जाते. ही योजना डिसेंबर 2018 मध्ये सुरू झाली आणि फेब्रुवारी 2019 पासून संपूर्ण देशभर लागू करण्यात आली. या योजनेचा उद्देश शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणे, शेतीसाठी लागणाऱ्या खर्चामध्ये मदत करणे आणि सावकारांपासून दूर ठेवणे आहे.