
Pm Kisan Samman Nidhi 20th Installment : देशातील कोट्यावधी शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 20 वा हप्ता देशातील 7.9 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाला आहे. यानुसार प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यात 2 हजार रुपये ट्रान्सफर केले गेले आहेत. आता शेतकऱ्यांना पुढील हप्त्यासाठी थोडी वाट पहावी लागणार आहे. पण का? याबद्दलच सविस्तर जाणून घेऊया.
पीएम किसान योजनेचा हप्ता कशा पद्धतीने येतो?
पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला 6 हजार रुपयांचे आर्थिक मदत केली जाते. यानुसार, 2 हजार रुपयांचे तीनवेळा हप्ते त्यांच्या खात्यात जमा केले जाता. पहिला हप्ता एप्रिल ते जुलै, दुसरा ऑगस्ट ते नोव्हेंबर आणि तिसरा डिसेंबर ते मार्चदरम्यान दिला जातो.
अपात्रतेच्या अटी
पीएम किसान सन्मान निधीच्या अपात्र शेतकऱ्यांवर विभागाकडून कठोर पाऊल उचलण्याची तयारी केली आहे. बहुतांश शेतकऱ्यांचा 20वा हप्ता थांबवण्यात आला आहे. पात्रतेच्या अटी पूर्ण न केल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
लिस्टमध्ये असे तपासून पहा नाव
पीएम किसान सन्मान निधी योजनेचे पैसे अनेक खात्यात पाठवणे थांबवले आहे. खरंतर, अशी काही प्रकरणे समोर आली आहेत की ज्यामध्ये अपात्र शेतकऱ्यांनाही योजनेचा लाभ मिळत होता. अशातच तुमचे नाव लिस्टमध्ये कसे तपासून पाहू शकता हे खाली जाणून घ्या.
21 वा हप्ता कधी येणार?
आता शेतकऱ्यांना खात्यात 21वा हप्ता कधी जमा होणार याची उत्सुकता लागली आहे. खरंतर, हा हप्ता डिसेंबर 2025 ते मार्च 2026 दरम्यान येऊ शकतो. याशिवाय 25 डिसेंबर ते 10 जानेवारी 2026 दरम्यान 21 वा हप्ता शेतकऱ्यांना मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, हप्ता येण्याची अधिकृत तारीख केंद्रीय कृषी मंत्रालय किंवा PMO यांच्याकडूनच केली जाईल.
या गोष्टींची घ्या काळजी
eKYC नक्की करून घ्या
ज्या शेतकऱ्यांचे eKYC अपूर्ण आहे त्यांना हप्ता मिळत नाही. जर तुम्हाला तुमचा २१ वा हप्ता कोणत्याही व्यत्ययाशिवाय वेळेवर तुमच्या खात्यात पोहोचवायचा असेल, तर PM किसान पोर्टल किंवा CSC केंद्रावर जा आणि तुमचा eKYC लवकरात लवकर अपडेट करा.
बँक खाते सक्रिय आणि आधार कार्डशी जोडा
बंद किंवा निष्क्रिय खात्यात पैसे ट्रान्सफर केले जात नाहीत. म्हणून, NPCI मॅपिंग आणि आधार लिंकिंगची स्थिती तपासा, जेणेकरून २१ वे आणि त्यानंतरचे हप्ते वेळेवर येत राहतील आणि तुम्ही त्याचा फायदा घेऊ शकाल.
जमिनीशी संबंधित कागदपत्रे स्पष्ट असावी
जर तुमच्या जमिनीचे विभाजन, वाद किंवा उत्परिवर्तन प्रलंबित असेल, तर पुढील हप्ता थांबवता येऊ शकतो. म्हणून, विलंब न करता, तुमच्या राज्यातील भू-रेकॉर्ड्स पोर्टलवरून स्थितीची माहिती मिळवा आणि जर काही तफावत असेल तर ती दुरुस्त करा.