PM Kisan Mandhan Yojana : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, वृद्धापकाळात दरमहा 3,000 रुपये पक्का पेन्शन! अर्ज कसा करावा?

Published : Jan 11, 2026, 08:27 PM IST

PM Kisan Mandhan Yojana : केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या वृद्धापकाळातील आर्थिक सुरक्षेसाठी 'प्रधानमंत्री किसान मानधन योजना' सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत, पात्र शेतकऱ्यांना वयाच्या 60 वर्षांनंतर दरमहा 3,000 रुपये पेन्शन मिळते. 

PREV
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी

मुंबई : शेतकऱ्यांचे आयुष्य बहुतेक कष्ट, अनिश्चित उत्पन्न आणि निसर्गावर अवलंबून असते. कामाच्या सक्रिय वयात रोज काबाडकष्ट करणाऱ्या अनेक शेतकऱ्यांकडे वृद्धावस्थेत नियमित उत्पन्नाचा ठोस आधार नसतो. ही गरज लक्षात घेऊन केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी ‘प्रधानमंत्री किसान मानधन योजना (PM Kisan Mandhan Yojana)’ सुरू केली आहे. या योजनेचा उद्देश वृद्धापकाळात शेतकऱ्यांना आर्थिक सुरक्षा देणे आणि इतरांवर अवलंबून राहणे टाळणे आहे. योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वयाच्या 60 वर्षानंतर दरमहा 3,000 रुपये निश्चित पेन्शन मिळणार आहे. 

27
योजना कोणासाठी?

प्रधानमंत्री किसान मानधन योजना ही लहान, अल्पभूधारक आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल शेतकऱ्यांसाठी सुरु केलेली ऐच्छिक सामाजिक सुरक्षा योजना आहे. सामान्य नोकरी करणारे लोक पीएफ, विमा किंवा पेन्शन योजनांमधून निवृत्तीची तयारी करतात, परंतु शेतकऱ्यांकडे बहुतेकदा अशी व्यवस्था नसते. त्यामुळे वृद्धावस्थेत आर्थिक अडचणी टाळण्यासाठी ही योजना उपयुक्त ठरते. 

37
हप्त्याची रक्कम किती?

योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांचे वय 18 ते 40 वर्षांदरम्यान असणे आवश्यक आहे. नोंदणी झाल्यानंतर

दरमहा हप्ते: वयानुसार 55 रुपये ते 200 रुपये

सरकारची मॅचिंग रक्कम: शेतकऱ्याने भरलेली रक्कम केंद्र सरकारसुद्धा तितकीच जमा करते

यामुळे कमी गुंतवणुकीत भविष्यात चांगला लाभ मिळतो. 

47
अर्ज प्रक्रिया सोपी

नोंदणीसाठी

जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) मध्ये जा

आवश्यक कागदपत्रे

आधार कार्ड

बँक खाते (आधारशी लिंक केलेले)

मोबाईल नंबर

शेतीशी संबंधित कागदपत्रे (सातबारा/आठ-अ उतारा)

सर्व माहिती भरल्यानंतर शेतकऱ्यांची नोंदणी पूर्ण होते. 

57
पेन्शन वितरणाची प्रक्रिया

वयाच्या 60 वर्षानंतर दरमहा 3,000 रुपये थेट बँक खात्यात जमा

शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यास पत्नीला अर्धी पेन्शन (1,500 रुपये)

पीएम किसान सन्मान निधीतून मिळणारी रक्कम हप्त्यांमध्ये वापरण्याची मुभा 

67
अपात्रता कोणासाठी?

आयकर भरणारे शेतकरी

केंद्र / राज्य सरकारी कर्मचारी, निवृत्त अधिकारी, खासदार, आमदार, महापौर

EPFO, ESIC, राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना किंवा तत्सम सामाजिक सुरक्षा योजनांचे लाभार्थी

नोंदणीकृत डॉक्टर, वकील, अभियंते 

77
लवकर नोंदणी फायदेशीर का?

जितक्या लवकर नोंदणी, तितका मासिक हप्ता कमी

वृद्धापकाळात नियमित आणि खात्रीशीर पेन्शन

आर्थिक सुरक्षा आणि चिंतामुक्त जीवन

सरकारचा विश्वास आहे की, या योजनेमुळे शेतकऱ्यांना वृद्धावस्थेत सन्मानाने आणि सुरक्षित जीवन मिळेल.

RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...
Read more Photos on

Recommended Stories