Real estate: देशात रिअल इस्टेट क्षेत्र वेगाने वाढत आहे. भागाचा विचार न करता जमिनी आणि फ्लॅट्सच्या किमती वाढत आहेत. याच दरम्यान, पुण्यातील एका व्यक्तीने आपला याबाबतचा शेअर केलेला अनुभव इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात सध्या व्हायरल होत आहे.
भारतातील रेसिडेन्शियल रिअल इस्टेट मार्केट वेगाने वाढत असल्याच्या चर्चांदरम्यान, पुण्यातील कुणाल गांधी नावाच्या तरुणाने आपला अनुभव एक्सवर शेअर केला आहे. फ्लॅटच्या किमती पाहता, मागणी खरोखरच इतकी वाढली आहे का? की हा फुगा कधीही फुटण्याचा धोका आहे? अशी शंका त्याने व्यक्त केली आहे.
25
स्वतःच्या घराच्या प्रयत्नात बसलेला धक्का
पुण्यात स्वतःचे घर खरेदी करण्याच्या विचाराने काही काळापासून शोध घेत असल्याचे कुणालने सांगितले. गेल्या महिन्यात वाकड भागातील एका बांधकाम सुरू असलेल्या प्रोजेक्टला भेट देऊन किमतींची माहिती घेतली. तिथे थ्री-बेडरूम फ्लॅटसाठी 1.80 कोटी रुपये सांगितले. घरात बोलून निर्णय घेतो, असे सांगून तो तिथून निघून गेला.
35
एका महिन्यात 20 लाखांची वाढ
काही काळानंतर त्याच फ्लॅटसाठी पुन्हा गेलेल्या कुणालला धक्का बसला. एका महिन्यातच किंमत 2 कोटी रुपयांवर पोहोचल्याचे सेल्स टीमने सांगितले. इतक्या कमी वेळात 20 लाख रुपये कसे वाढले, असे विचारल्यावर मागणी जास्त असल्याचे कारण देण्यात आले.
एवढ्यावरच न थांबता, आणखी आठ-दहा दिवसांत त्याच फ्लॅटची किंमत 2.15 कोटी रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता असल्याचे डेव्हलपरने सांगितल्याचे कुणालने उघड केले. आजूबाजूच्या परिसरातही अशीच परिस्थिती असून, प्रत्येक प्रोजेक्टमध्ये किमती वेगाने वाढत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
55
या तेजीमागेचे सत्य काय आहे?
होणारी दरवाढ पाहता, 'ही वाढ तात्पुरती आहे का?' अशी शंका येत असल्याचे कुणालने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. त्याचे हे मत सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. काही युजर्सनी रेसिडेन्शियल मार्केटमध्ये खरोखरच मागणी वाढल्याचे म्हटले आहे, तर काहींनी ही नैसर्गिक मागणी नसून केवळ एक तेजी (बूम) असल्याचे म्हटले आहे.