PM Kisan Yojana 22th Installment: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! २२ व्या हप्त्याचे ₹२००० 'या' तारखेला खात्यात येणार; तुमचे नाव यादीत आहे का? असे तपासा!

Published : Feb 08, 2026, 08:16 PM IST

PM Kisan Yojana 22th Installment: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा २२ वा हप्ता होळीपूर्वी जमा होण्याची शक्यता आहे. मात्र, सरकारने ई-केवायसी आणि शेतकरी आयडी अनिवार्य केले असून, या प्रक्रिया पूर्ण न केल्यास शेतकऱ्यांचा २,००० चा हप्ता थांबू शकतो.

PREV
18
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी!

मुंबई : केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-Kisan) योजनेअंतर्गत देशातील पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी ६,००० रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात तीन समान हप्त्यांमध्ये जमा केली जाते. सध्या देशभरातील शेतकरी २०२६ मधील २२ व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत असून, कृषी मंत्रालयाकडून यासाठीची प्रशासकीय तयारी पूर्ण झाल्याची माहिती समोर आली आहे. 

28
मागील हप्ता कधी मिळाला होता?

पीएम-किसान योजनेचा २१ वा हप्ता १९ नोव्हेंबर २०२५ रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला होता. त्यानंतर आता पुढील हप्ता कधी मिळणार, याकडे लाखो लाभार्थ्यांचे लक्ष लागले आहे. 

38
होळीपूर्वी खात्यात येणार पैसे?

विविध मीडिया रिपोर्ट्स आणि सरकारी सूत्रांच्या माहितीनुसार, २२ वा हप्ता होळीपूर्वी म्हणजेच मार्चच्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. मात्र, यासाठी सरकारने काही अटी पूर्ण करणे आता बंधनकारक केले आहे. 

48
२२ व्या हप्त्यासाठी सरकारचे नवे नियम

पीएम-किसान योजनेत पारदर्शकता वाढवण्यासाठी आणि अपात्र लाभार्थ्यांना वगळण्यासाठी केंद्र सरकारने काही महत्त्वाचे बदल लागू केले आहेत. यानुसार, ई-केवायसी (e-KYC) आणि शेतकरी आयडी या दोन प्रक्रिया पूर्ण करणे आता अनिवार्य करण्यात आले आहे. ई-केवायसी प्रक्रियेत आधार क्रमांकाशी लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर ओटीपी येतो. ओटीपी पडताळणी पूर्ण झाल्यानंतर केवायसी प्रक्रिया यशस्वी होते. त्याचबरोबर, प्रत्येक लाभार्थ्याचा शेतकरी आयडी तयार किंवा अपडेट असणे आवश्यक आहे. यापैकी कोणतीही प्रक्रिया अपूर्ण राहिल्यास २,००० रुपयांचा हप्ता थांबवला जाऊ शकतो, त्यामुळे वेळेत ही कामे पूर्ण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. 

58
जमीन आणि वैयक्तिक माहिती अचूक असणे गरजेचे

फक्त ई-केवायसी करून चालणार नाही. शेतकऱ्यांची जमीन नोंद, आधार क्रमांक, बँक खाते तपशील आणि मोबाईल नंबर अचूक असणे तितकेच आवश्यक आहे. जर जमीन नोंदी नीट जोडलेल्या नसतील, आधार-बँक लिंकिंगमध्ये अडचण असेल किंवा मोबाईल नंबर अपडेट नसेल, तर पडताळणी प्रक्रियेत अडथळा येऊ शकतो. अशा वेळी हप्ता उशिरा मिळण्याची किंवा रद्द होण्याची शक्यता असते. 

68
२२ वा हप्ता नेमका कधी जमा होणार?

आतापर्यंत कृषी मंत्रालयाकडून २२ व्या हप्त्याच्या तारखेबाबत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र, उपलब्ध माहितीनुसार हा हप्ता १ ते ३ मार्चदरम्यान किंवा ४ मार्चपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाऊ शकतो. होळीच्या सणाआधी शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देण्याच्या उद्देशाने केंद्र सरकार हा हप्ता लवकर वितरित करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

78
शेतकऱ्यांनी आत्ताच काय करावे?

हप्ता वेळेत आणि कोणत्याही अडचणीशिवाय मिळावा यासाठी शेतकऱ्यांनी पुढील गोष्टी तातडीने तपासाव्यात

pmkisan.gov.in या अधिकृत पोर्टलवर जाऊन ओटीपी-आधारित ई-केवायसी पूर्ण करा

शेतकरी आयडी तयार आहे का किंवा अपडेट आहे का, याची खात्री करा 

88
बँक खाते आधारशी लिंक आहे का ते तपासा

वैयक्तिक माहिती (मोबाईल नंबर, पत्ता) अद्ययावत ठेवा

ऑनलाइन प्रक्रिया अवघड वाटत असल्यास, जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) मध्ये जाऊन मदत घेता येईल.

RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...
Read more Photos on

Recommended Stories