शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर!, या दिवशी खात्यात जमा होणार ₹2,000

Published : Jul 30, 2025, 09:41 AM ISTUpdated : Jul 30, 2025, 09:57 AM IST

PM-Kisan Samman Nidhi Yojana 20th Kisht Date: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 20 वा हप्ता 2 ऑगस्ट 2025 रोजी 9.3 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही रक्कम थेट हस्तांतरित करतील.

PREV
16

PM-Kisan Samman Nidhi Yojana 20th Kisht Date: देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 20 वा हप्ता लवकरच जारी केला जाणार आहे. याची तारीखही जाहीर झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 2 ऑगस्ट 2025 रोजी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे 9.3 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात ₹2,000 रुपये थेट जमा करतील.

26

ही योजना 2019 मध्ये सुरू करण्यात आली होती. यामध्ये लहान व मध्यम शेतकऱ्यांना दरवर्षी ₹6,000 आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम दर चार महिन्यांनी ₹2,000 च्या तीन समान हप्त्यांमध्ये दिली जाते. आतापर्यंत 19 हप्ते वितरित करण्यात आले आहेत. 20 व्या हप्त्यानंतर हे चक्र पुढे सुरू राहणार आहे.

36

शेतकऱ्यांच्या खात्यात कधी येईल पैसा?

पंतप्रधान नरेंद्र मोदी 2 ऑगस्ट 2025 रोजी वाराणसी (उत्तर प्रदेश) येथून हा हप्ता जाहीर करतील. त्याच दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात थेट ₹2,000 जमा होतील. हे पैसे DBT (Direct Benefit Transfer) प्रणालीद्वारे आधार संलग्न बँक खात्यात पाठवले जातील, जेणेकरून व्यवहारात पारदर्शकता राहील आणि योग्य वेळी मदत पोहोचेल.

46

पात्रता आणि आवश्यक गोष्टी

केवळ ई-केवायसी पूर्ण केलेले शेतकरी आणि जमिनीचे रेकॉर्ड व्हेरिफाय झालेले शेतकरीच या हप्त्याचा लाभ घेऊ शकतील.

pmkisan.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन शेतकऱ्यांनी आपले स्टेटस तपासावे.

हप्त्याची रक्कम खात्यात जमा झाल्यावर मोबाईलवर एसएमएस अलर्ट येईल.

या दिवशी लाखो शेतकरी प्रत्यक्ष आणि व्हर्च्युअल माध्यमातून या कार्यक्रमात सहभागी होतील.

56

स्टेटस कसे तपासाल?

pmkisan.gov.in वर जा

“Beneficiary Status” किंवा “किसान स्थिति” वर क्लिक करा

आपला आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक, किंवा नोंदणी क्रमांक टाका

“Get Data” किंवा “Get Status” बटणावर क्लिक करा

स्क्रीनवर आपला हप्ता मिळाल्याची संपूर्ण माहिती दिसेल

जर आपले नाव यादीत असेल, तर नक्कीच ₹2,000 तुमच्या खात्यात जमा होईल.

66

पैसे न मिळाल्यास काय करावे?

जर तुमच्या खात्यात पैसे आले नाहीत, तर खालील माध्यमांनी तक्रार करू शकता:

हेल्पलाइन क्रमांक: 011-23381092

ईमेल: pmkisan-ict@gov.in

सरकारचा उद्देश म्हणजे शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे. बियाणे, खत, शेतीसाठी लागणारे साहित्य किंवा घरगुती खर्च यासाठी ही रक्कम मोठा आधार ठरते.

RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...
Read more Photos on

Recommended Stories