PM Kisan 20वा हप्ता 2 ऑगस्टला खात्यात! तुमचं नाव यादीत आहे का?, लगेच तपासा

Published : Jul 30, 2025, 05:48 PM IST
PM Kisan Yojana

सार

PM Kisan Yojana 20th Installment : पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत 2 ऑगस्ट 2025 रोजी 20 वा हप्ता वितरित केला जाणार आहे. पात्र शेतकऱ्यांना ₹2000 थेट त्यांच्या खात्यात जमा केले जातील. 

PM Kisan Yojana 20th Installment : पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या 20 व्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. 2 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 11 वाजता, केंद्र सरकारकडून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात 2,000 रुपयांचा हप्ता थेट जमा केला जाणार आहे.

पाच महिन्यांनंतर दिलासा!

गेल्या फेब्रुवारी 2025 मध्ये 19 वा हप्ता जमा झाल्यानंतर तब्बल पाच महिने झाले होते, आणि त्या वेळेपासूनच शेतकरी 20व्या हप्त्याची वाट पाहत होते. सोशल मिडियावर अनेक अंदाज आणि अफवा सुरू असताना, शेवटी कृषी मंत्रालयाने अधिकृत घोषणा करत या प्रतीक्षेला पूर्णविराम दिला आहे.

तुमचं नाव लाभार्थी यादीत आहे का?

हप्ता मिळणार आहे की नाही, हे तपासण्यासाठी तुमचं नाव लाभार्थी यादीत आहे का ते खालीलप्रमाणे तपासा

pmkisan.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

होमपेजवर ‘Beneficiary Status’ या पर्यायावर क्लिक करा.

तुमचा आधार क्रमांक किंवा बँक खाते क्रमांक प्रविष्ट करा.

‘Get Data’ वर क्लिक करताच तुमचं नाव यादीत दिसेल का ते तपासा.

नाव दिसल्यास: तुमचं खाते पात्र असून हप्ता लवकरच मिळेल.

नाव नसल्यास: जवळच्या कृषी कार्यालयाशी किंवा CSC केंद्राशी तात्काळ संपर्क साधा.

हप्ता मिळण्यासाठी आवश्यक अटी

20वा हप्ता फक्त त्याच शेतकऱ्यांना मिळणार आहे, ज्यांची खालील प्रक्रिया पूर्ण झाली आहे:

आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणे आवश्यक

मोबाईल नंबर अपडेट असणे

e-KYC प्रक्रिया पूर्ण झालेली असणे

या अटी पूर्ण नसल्यास हप्ता रोखला जाऊ शकतो.

हप्ता न आल्यास काय कराल?

जर 19 वा किंवा 20 वा हप्ता अजूनही खात्यात जमा झाला नसेल, तर खालीलप्रमाणे तक्रार दाखल करा:

ऑनलाइन तक्रार:

pmkisan.gov.in संकेतस्थळावर जा.

‘किसान कॉर्नर’ या विभागात जा.

‘Register Grievance (तक्रार नोंदवा)’ वर क्लिक करा.

तुमचे तपशील भरून तक्रार सबमिट करा.

‘Complaint Status’ मध्ये तक्रारीचा मागोवा घेता येईल.

टोल-फ्री हेल्पलाइन:

155261

1800-115-526

इतर पर्याय:

जवळच्या CSC केंद्रात किंवा स्थानिक कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क करा.

शेतकऱ्यांनो, हप्ता मिळवण्यासाठी सगळी प्रक्रिया पूर्ण झाली आहे का, हे आजच तपासा! यादीत नाव आहे की नाही, खाते अपडेट आहे का, हे बघा. केंद्र सरकारकडून मिळणारा हा आर्थिक आधार तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे. त्यामुळे कोणतीही प्रक्रिया राहून जाऊ नये याची काळजी घ्या!

 

PREV
RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...
Read more Articles on

Recommended Stories

बाबो, लई भारी! सॅलरी स्लिपशिवाय मिळवा Personal Loan, तेही तासाभरात मंजुरी!
दादा Mahindra चा वादा! नवीन Scorpio N जबरदस्त फीचर्सनी सर्वांना करणार चकीत