Mumbai Port Trust Bharti 2025 : मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये ५४ स्पोर्ट्स ट्रेनी पदांसाठी भरती सुरू

Published : Jul 29, 2025, 10:08 PM ISTUpdated : Jul 29, 2025, 10:09 PM IST
mumbai port trust

सार

Mumbai Port Trust Bharti 2025 : मुंबई पोर्ट ट्रस्टच्या अंतर्गत असलेल्या मुंबई पोर्ट अथॉरिटी स्पोर्ट्स क्लबने स्पोर्ट्स ट्रेनी पदांसाठी ५४ जागांसाठी भरती जाहीर केली आहे. 

मुंबई : मुंबई पोर्ट ट्रस्ट (MPT) अंतर्गत असलेल्या मुंबई पोर्ट अथॉरिटी स्पोर्ट्स क्लबने युवा खेळाडूंसाठी एक सुवर्णसंधी आणली आहे. स्पोर्ट्स ट्रेनी (Sports Trainee) या पदांसाठी एकूण ५४ जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. ही भरती केवळ १० महिन्यांच्या करारावर आधारित (contract basis) असेल. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपले अर्ज ऑफलाइन पद्धतीने ११ ऑगस्ट २०२५ पर्यंत सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

भरती तपशील

संस्थेचे नाव: मुंबई पोर्ट ट्रस्ट (MPT) च्या मुंबई पोर्ट अथॉरिटी स्पोर्ट्स क्लब

पदाचे नाव: स्पोर्ट्स ट्रेनी

एकूण पदे: ५४ जागा

नोकरी ठिकाण: मुंबई

अर्जाची पद्धत: ऑफलाइन

अधिकृत वेबसाईट: http://mumbaiport.gov.in/

पदांनुसार रिक्त जागा

खेळ एकूण पदे

ॲथलेटिक्स ४

शटल बॅडमिंटन २

क्रिकेट १०

फुटबॉल ११

हॉकी ११

कबड्डी ९

व्हॉलीबॉल ७

एकूण ५४

महत्त्वाच्या तारखा

अर्ज सादर करण्याची सुरुवात: २६ जुलै २०२५

अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख: ११ ऑगस्ट २०२५

शैक्षणिक पात्रता

प्रत्येक पदासाठी आवश्यक असलेली सविस्तर शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी उमेदवारांनी अधिकृत जाहिरात PDF काळजीपूर्वक वाचणे अनिवार्य आहे.

वयोमर्यादा

अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय १८ ते २५ वर्षांच्या दरम्यान असावे.

वेतन आणि इतर लाभ

मासिक मानधन (Stipend): १६,०००/- रुपये प्रति महिना.

किट आणि गिअर: १०,०००/- रुपये प्रति वर्ष.

निवास (Accommodation): पोर्ट क्वार्टर्समध्ये सामायिक तत्त्वावर (विनामूल्य).

मेडिक्लेम (Mediclaim) + अपघात विमा (Accident Insurance): ७,५००/- रुपये प्रति वर्ष.

अर्ज पाठवण्याचा पत्ता

आपले अर्ज खालील पत्त्यावर पाठवावेत:

JT. General Secretary Mumbai Port Authority Sports Club, 3rd Floor, Imperial Chambers, S.S. Taloni Marg, Opp. New Custom House, Ballard Estate, Mumbai-400 001

टीप: अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी मुंबई पोर्ट ट्रस्टच्या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध झालेली सविस्तर जाहिरात (जाहिरात PDF) काळजीपूर्वक वाचून सर्व अटी व शर्ती समजून घ्याव्यात.

PREV
RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...
Read more Articles on

Recommended Stories

मोठी बातमी! रेपो रेट घटला! पण तुमचा Home Loan EMI नेमका किती रुपयांनी कमी होणार? ही आकडेवारी तुम्हाला आनंद देईल!
स्वप्न पूर्ण करा! IndiGo मध्ये पायलट व्हायचंय? जाणून घ्या 'करोडो' रुपयांचे पॅकेज, सुविधा आणि नेमका पगार किती?