
मुंबई : आजच्या डिजिटल युगात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) ही सर्वात प्रगत आणि मागणी असलेली टेक्नॉलॉजी ठरली आहे. गूगल, मायक्रोसॉफ्ट, मेटा यांसारख्या मोठ्या कंपन्या एआय क्षेत्रात अब्जावधींची गुंतवणूक करत आहेत. परिणामी, स्मार्ट सर्च इंजिन्स, व्हॉईस असिस्टंट्स, सेल्फ-ड्रायव्हिंग गाड्या आणि हेल्थकेअरमधील बुद्धिमान सोल्यूशन्स या सगळ्यांची झपाट्याने प्रगती होते आहे.
यामुळेच AI Engineer ही पोस्ट आज टेक इंडस्ट्रीतील सर्वोच्च आणि हाय पेड नोकऱ्यांपैकी एक ठरली आहे. गूगलसारख्या कंपनीमध्ये काम करण्याचं स्वप्न बाळगणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्णसंधी आहे.
गूगल इंडिया मध्ये एआय इंजिनियर (ML Engineer / Data Scientist / Applied Scientist) चा सरासरी पगार:
₹25 लाख – ₹60 लाख वार्षिक
5+ वर्षांचा अनुभव असलेल्या सीनियर प्रोफेशनल्सना ₹70 लाख – ₹1.2 कोटींपर्यंत पॅकेज
पीएचडी किंवा रिसर्च बॅकग्राउंड असणाऱ्यांना ₹1.5 कोटींपर्यंतचे ऑफर्स मिळू शकतात.
Google USA मध्ये AI Engineer साठी पगार
$120,000 – $200,000 बेस सॅलरी
बोनस, स्टॉक्ससह एकत्रित पॅकेज $200,000 – $400,000 पेक्षा अधिक
AI Engineer होण्यासाठी आवश्यक पात्रता व कौशल्ये
BE/BTech/ME/MTech (CS, IT, ECE, Electrical)
AI, Machine Learning, Data Science मध्ये MSc / M.Tech / Ph.D.
IITs, IIITs, IISc, MIT, Stanford सारख्या संस्थांमधून पदवी असेल तर अधिक चांगल्या संधी
प्रोग्रामिंग: Python (NumPy, Pandas, Scikit-Learn, TensorFlow, PyTorch), C++, Java
गणित: Linear Algebra, Probability, Statistics, Calculus
ML/DL Algorithm: Supervised/Unsupervised Learning, NLP, Computer Vision
टूल्स: TensorFlow, PyTorch, Keras, OpenAI APIs, JAX
Cloud/Big Data: GCP, AWS, Hadoop, Spark
DSA & Problem Solving + Communication Skills
डेटा स्ट्रक्चर व अल्गोरिदमवर प्रभुत्व मिळवा
2-3 दमदार प्रोजेक्ट्स तयार करा (NLP, CV, Recommendation Systems)
ओपन सोर्समध्ये योगदान द्या – GitHub वर सक्रिय व्हा
इंटर्नशिप करा – Google Summer of Code, Google AI Residency सारख्या प्रोग्राम्समध्ये सहभागी व्हा
रिसर्च पेपर्स प्रकाशित करा, जर्नल्स/कॉन्फरन्समध्ये सहभाग घ्या
AI क्षेत्र हे केवळ भविष्यातलं नव्हे, तर आजचं सर्वात गरजू, नावाजलेलं आणि कमाईचं क्षेत्र आहे. गूगलसारख्या कंपन्यांमध्ये एआय इंजिनियर म्हणून काम करण्यासाठी उत्तम स्किल्स, शैक्षणिक तयारी आणि योग्य प्रोजेक्ट्स असणं अत्यावश्यक आहे. मेहनत आणि दिशा योग्य असेल, तर करोडोंची नोकरी तुमच्यासाठी दूर नाही!