PM इंटर्नशिप योजना नव्या स्वरूपात पुन्हा सुरू होणार: स्टायपेंड वाढणार, वयाची मर्यादा 18 वर्षांवर येणार; कालावधी 6 महिन्यांवरून 1 वर्ष

Published : Aug 10, 2025, 07:36 PM IST

PM इंटर्नशिप योजनेच्या पहिल्या 2 टप्प्यांत आलेल्या अडचणींनंतर, केंद्र सरकारने योजनेत सुधारणा करण्याचा निर्णय घेतला. कंपन्यांचे स्थान, वयोमर्यादा यांसारख्या त्रुटी दूर करून, 2026-27 मध्ये 10 हजार कोटींपेक्षा अधिक बजेटसह ही योजना पुन्हा राबवली जाणारय.

PREV
14

मुंबई : पंतप्रधान इंटर्नशिप योजनेचे पहिले दोन टप्पे अपेक्षेनुसार यशस्वी ठरले नाहीत. यानंतर केंद्र सरकारने देशातील प्रमुख शैक्षणिक संस्थांकडून योजनेचे मूल्यमापन करून अभ्यास करवून घेतला. या अभ्यासातून कंपन्यांचे स्थान, वयोमर्यादा यांसारख्या चार प्रमुख त्रुटी समोर आल्या. आता कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने त्या चुका दूर करून नव्याने योजना राबविण्याचा रोडमॅप तयार केला आहे.

हा नवीन प्लान पंतप्रधान कार्यालयाकडे सुपूर्त केला जाणार असून 2026-27 मध्ये 10 हजार कोटींपेक्षा अधिक बजेटसह ही योजना राबवली जाणार आहे. सध्या योजनेचे बजेट 380 कोटी रुपये इतके आहे. तसेच, इंटर्नसाठी किमान वयोमर्यादा 21 वरून कमी करून 18 वर्ष केली जाणार आहे. स्टायपेंड देखील वाढवले जाईल आणि इंटर्नशिप कालावधी 6 महिन्यांऐवजी 1 वर्ष इतका असेल.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2024-25 च्या केंद्रीय अर्थसंकल्पात या योजनेची घोषणा केली होती. या योजनेअंतर्गत पाच वर्षांत देशातील टॉप 500 कंपन्यांमध्ये 1 कोटी युवकांना पेड इंटर्नशिप देण्याचे उद्दिष्ट होते. नोंदणी प्रक्रियाही 15 नोव्हेंबरपर्यंत पार पडली होती, मात्र अडचणींमुळे ही योजना तात्पुरती स्थगित करण्यात आली होती.

24

योजनेतील चार प्रमुख त्रुटी

सरकारने ही माहिती आर्थिक व्यवहारांची संसदीय समितीसमोर मांडली. IIM बेंगळुरू, दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, सिम्बायोसिस बिझनेस मॅनेजमेंट आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ कॉर्पोरेट अफेयर्स यांनी कंपनी आणि उमेदवारांचे फीडबॅक तपासले. त्यातून सहभाग कमी असण्याची चार प्रमुख कारणे पुढे आली.

कंपनीचे स्थान महत्त्वाचे ठरते – उमेदवारांची पसंती 5 ते 10 किमी अंतरावरील कंपन्यांना अधिक होती.

इंटर्नशिप कालावधी जास्त आहे – सामान्य कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रमांपेक्षा हा कालावधी मोठा होता.

उपलब्ध ऑफरमध्ये आवड नव्हती – अनेक उमेदवारांना दिलेल्या ऑफरमध्ये रस नव्हता.

वयोमर्यादा घटवण्याची गरज – ITI, पॉलिटेक्निकमधून आलेल्या उमेदवारांनी वयोमर्यादा कमी करण्याची मागणी केली होती.

34

राउंड 1 चे निकाल

686 जिल्हे, 1.80 लाख उमेदवार, 6.45 लाख अर्ज

80,000 इंटर्नशिप कंपन्यांकडून ऑफर

28% अर्ज महिला उमेदवारांकडून

60,000 उमेदवारांनी ऑफर स्वीकारल्या

फक्त 8,700 उमेदवारांनी इंटर्नशिप जॉइन केली

44

राउंड 2 चे निकाल

745 जिल्हे, 2.14 लाख उमेदवार, 4.55 लाख अर्ज

41% अर्ज महिला उमेदवारांकडून

327 कंपन्यांकडून 1.18 लाख इंटर्नशिप ऑफर

दुसऱ्या टप्प्याची निवड प्रक्रिया अजून सुरू आहे

RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...
Read more Photos on

Recommended Stories