PF Investment : EPFO अंतर्गत PF योजनेचा योग्य उपयोग केल्यास, मध्यमवर्गीय नोकरदारही निवृत्तीनंतर ₹5 कोटींहून अधिक रक्कम जमा करू शकतात. नव्याने वाढलेला 8.25% व्याजदर आणि नियमित योगदानामुळे हे शक्य आहे.
PF Investment : सामान्य पगारदार व्यक्तीही करोडपती होऊ शकतो हे खरे आहे. फक्त योग्य नियोजन आणि गुंतवणुकीच्या माध्यमातून! EPFO अंतर्गत सुरू असलेल्या PF (Provident Fund) योजनेचा योग्य उपयोग केल्यास मध्यमवर्गीय नोकरदारही निवृत्तीनंतर ₹5 कोटींहून अधिक रक्कम जमा करू शकतो.
26
PF योजना म्हणजे नेमकं काय?
केंद्र सरकारने खाजगी आणि सरकारी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी ही योजना सुरू केली आहे. या अंतर्गत, कर्मचाऱ्याच्या मूळ पगाराच्या 12% रक्कमेची कपात PF मध्ये केली जाते, आणि कंपनी देखील तितकीच रक्कम PF मध्ये भरते. म्हणजे दरमहा पगाराचा एकूण 24% रक्कम सुरक्षित भविष्याच्या दिशेने वाटचाल करते.
36
नव्याने वाढलेला व्याजदर
EPFO ने 2024-25 साठी PF वरील व्याजदर 8.15% वरून 8.25% पर्यंत वाढवला आहे.
ही वाढ गुंतवणूकदारांसाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकते, विशेषतः दीर्घकालीन मुदतीत.