Marathi

कानाची पाळी लोंबकळणार नाही, वजनदार झुमके घालण्याच्या ५ सोप्या ट्रिक्स

अनेक महिलांना वजनदार झुमके किंवा कानातले घालायला आवडतात. पण त्यामुळे कानाची पाळी सैल पडून लोंबकळू लागते. ही समस्या टाळण्यासाठी काही सोप्या टिप्स जाणून घेऊया.
Marathi

या ५ स्मार्ट ट्रिक्स वापरून पाहा

वजनदार कानातले घातल्यामुळे कानाचं छिद्र मोठं होतं आणि पाळी सैल दिसू लागते. तुमची स्टाईलही कायम राहावी आणि कानही सुरक्षित राहावेत असं वाटत असेल, तर या ५ स्मार्ट ट्रिक्स नक्की वापरा.
Image credits: pinterest
Marathi

इअरलोब सपोर्ट पॅच नक्की लावा

आजकाल बाजारात इअरलोब सपोर्ट पॅच (Earlobe Support Patch) किंवा टेप मिळतात. हे कानाच्या पाळीमागे चिकटवले जातात. यामुळे झुमक्यांचं वजन थेट छिद्रावर येत नाही आणि कान ओढले जात नाहीत.
Image credits: pinterest
Marathi

चेन सपोर्ट असलेले झुमके वापरा

काही झुमक्यांना वरच्या बाजूला बारीक चेन असते, जी केसांमध्ये पिनने अडकवता येते. यामुळे कानातल्यांचं वजन कानाऐवजी केसांवर विभागलं जातं, कानावरचा ताण कमी होतो. यामुळे खूप आराम मिळतो.

Image credits: Pinterest
Marathi

जाड आणि मजबूत स्टॉपर वापरा

पातळ, कमकुवत क्लिप झुमक्यांना नीट आधार देत नाही. म्हणून सिलिकॉनचा, रुंद बेस स्टॉपर लावा. स्क्रू टाईप बॅक जास्त सुरक्षित असतो. झुमका पुढे झुकत नाही, कानाच्या पाळीवर कमी ताण येतो.

Image credits: Our own
Marathi

हलक्या वजनाचे मटेरियल निवडा

दिसायला वजनदार पण वजनाने हलके असलेले झुमके निवडा. जसं की, 1gm गोल्ड ज्वेलरी, सिल्व्हर फॉइल बेस, मणी किंवा थ्रेड वर्क असलेले कानातले. हे स्टायलिश दिसतात आणि कानही ओढले जात नाहीत.
Image credits: pinterest
Marathi

सतत अनेक तास घालू नका

प्रत्येक २-३ तासांनी झुमके काढून १०-१५ मिनिटं कानांना आराम द्या. रात्रभर वजनदार कानातले घालून झोपू नका. जर कानात जळजळ किंवा वेदना होत असतील, तर ते लगेच काढून टाका. 

Image credits: Pinterest
Marathi

योग्य आधार आणि काळजी गरजेची

वजनदार झुमके घालणं चुकीचं नाही, पण त्यासाठी योग्य आधार आणि काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे. या छोट्या-छोट्या गोष्टी लक्षात ठेवल्यास तुम्ही कानाची पाळी सैल होण्यापासून वाचवू शकता.
Image credits: Our own

Pakistani Juti: रमजानसाठी खास, हेवी लुकसोबत रॉयल ग्रेस देणाऱ्या ८ खास जुती

Chunky Gold Bracelet: कॉलेजला जाणाऱ्या मुलीसाठी घ्या 9 कॅरेटमधील हे 7 सॉलिड गोल्ड ब्रेसलेट

Plant Care: तुळशीच्या कुंडीत मीठ टाकताय? थांबा! जाणून घ्या सत्य...

Platinum Couple Rings: प्लॅटिनम कपल रिंग्जनं करा नात्याची मजबूत सुरुवात, आयुष्यभर टिकेल जोडी!