पेन्शन-ग्रॅच्युएटीसंदर्भात केंद्राकडून नव्या गाइडलाइन्स जारी करण्यात आल्या आहेत. यानुसार, सेवानिवृत्ती तारखेच्या दोन महिन्यांआधी PPO म्हणजेच पेन्शन पेमेंट ऑर्डर जारी करावे लागणार आहे.
पेन्शन आमि ग्रॅच्युएटी बद्दल केंद्र सरकारने नव्या गाइडलाइन्स नुकत्याच जारी केल्या आहेत. या गाइडलाइन्सनुसार, सेवानिवृत्ती तारखेच्या दोन महिन्यांआधी पेन्शन पेमेंट ऑर्डर जारी करावे लागणार आहे. याशिवाय DoPPW म्हणजे पेन्शन आणि पेन्शनर्स कल्याण विभागाने नव्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. जेणेकरुन सेवानिवृत्तीची तारीख जवळ आलेल्या कर्मचाऱ्यांना उशिराने पेन्शन आणि ग्रॅच्युएटी मिळणार नाही.
केंद्र सरकारच्या पेन्शन आणि ग्रॅच्युएटीसंदर्भात नव्या गाइडलाइन्स
25 ऑक्टोबर, 2024 च्या नव्या गाइडलाइन्सनुसार, सेवानिवृत्तीच्या लिस्टची तयारी ते पेन्शन पेमेंट ऑर्डरपर्यंतची वेळोवेळी प्रक्रिया पार पडणे आवश्यक आहे. यासाठी ठरवण्यात आलेल्या कालावधीचे पालन करावे. विभागाकडून सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना पेन्शन आणि ग्रॅच्युएटीचा लाभ मिळण्यासाठी सर्वोतोपरी मदत केली जाईल.
DoPPW च्या गाइडलाइननुसार, सेवानिवृत्तीच्या जवळ पोहोचलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या मदतीसाठी पेन्शन आणि ग्रॅच्युएटीचा लाभ देण्यासाठी खास वेळेची मर्यादा ठरवण्यात आली आहे. जेणेकरुन कर्मचाऱ्यांना कोणत्याही प्रकारची समस्या उद्भवू नये.
प्रत्येक महिन्याच्या 15 तारेखेपर्यंत ते पुढील 15 महिन्यांमध्ये सेवानिवृत्त होणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांची लिस्ट तयार करावी लागेल. यामुळे सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांबद्दल कळले जाईल. याशिवाय कर्मचाऱ्यांची पेन्शन आणि ग्रॅच्युएटीची प्रक्रिया जलद होईल.
वेळेवर पेमेंट करावे
DoPPW ने म्हटले आहे की, नियम 54 नुसार, प्रत्येक विभागाध्यक्षने प्रत्येक महिन्याच्या 15 तारखेला अशा कर्मचाऱ्यांची लिस्ट तयार करायची आहे जे त्या तारखेपासून ते पुढील 15 महिन्यांमध्ये सेवानिवृत्त होणार आहेत.
पेन्शनचे प्रकरण लेखा अधिकारी यांच्याकडे पोहोचल्यानंतर आवश्यक पडताळणी करावी. कर्मचाऱ्याच्या सेवनिवृत्तीच्या कमीतकमी दोन महिन्याआधी पेन्शन पेमेंट ऑर्डर जारी करावे लागणार आहे. ही प्रक्रिया पेन्शन आणि ग्रॅच्युएटी देण्यासाठी कोणताही विलंब होऊ नये म्हणून तयार करण्यात आली आहे.
आणखी वाचा :
एक्सप्रो इंडिया: ₹१ लाख ते ₹१.५ कोटी, ८ रुपयांपासून ते ११५० पर्यंतचा प्रवास
जिओचा धमाकेदार दिवाळी ऑफर: १ वर्षांची वैधता, मोफत कॉलिंग, १.५ जीबी डेटा