PAN-Aadhaar Link Status Check : पॅन-आधार लिंक करण्याची अंतिम मुदत ३१ डिसेंबर आहे, अन्यथा तुमचे पॅन कार्ड निष्क्रिय होऊन आर्थिक व्यवहार थांबू शकतात. तुमचे कार्ड लिंक आहे की नाही, हे तपासण्यासाठी आयकर विभागाच्या वेबसाईटवर ऑनलाइन पद्धत चेक करता येईल.
PAN-Aadhaar Link Status Check : आधार आणि पॅन कार्ड ही केवळ कागदपत्रे नसून तुमच्या आर्थिक व्यवहारांची 'लाईफलाईन' आहेत. बँकेत खाते उघडण्यापासून ते शेअर मार्केटमधील गुंतवणुकीपर्यंत प्रत्येक ठिकाणी पॅन कार्ड अनिवार्य आहे. मात्र, सरकारने पॅन-आधार लिंक करण्यासाठी ३१ डिसेंबर ही अंतिम मुदत दिली आहे. जर तुम्ही हे काम वेळेत पूर्ण केले नाही, तर तुमच्या खिशातील पॅन कार्ड केवळ 'प्लास्टिकचा तुकडा' ठरेल. अनेकांना आपले कार्ड लिंक आहे की नाही, याबाबत संभ्रम आहे. चला तर मग, जाणून घेऊया तुमचे स्टेटस तपासण्याच्या दोन अत्यंत सोप्या पद्धती.
25
पॅन कार्ड 'इनअॅक्टिव्ह' झाले तर काय होईल?
जर तुमचे पॅन कार्ड आधारशी लिंक नसेल, तर तुम्हाला खालील संकटांचा सामना करावा लागेल.
बँकिंग व्यवहार ठप्प: तुमचे KYC फेल होईल आणि पगार जमा होण्यास अडथळे येतील.
गुंतवणूक फ्रीज: म्युच्युअल फंड (SIP) आणि शेअर बाजारातील व्यवहार बंद पडतील.
रिफंड अडकणार: आयकराचा परतावा (Income Tax Refund) मिळणार नाही.
जादा टीडीएस: तुम्हाला दुप्पट दराने TDS भरावा लागू शकतो.
35
ऑनलाईन स्टेटस कसे तपासायचे? (Quick Steps)
१. सर्वप्रथम आयकर विभागाच्या www.incometax.gov.in या अधिकृत पोर्टलला भेट द्या.
२. होमपेजवर 'Quick Links' या पर्यायामध्ये 'Link Aadhaar Status' वर क्लिक करा.
३. तुमचा १० अंकी पॅन नंबर आणि १२ अंकी आधार नंबर अचूक टाका.
४. 'View Link Aadhaar Status' वर क्लिक करताच तुमचे कार्ड लिंक आहे की नाही, याचा मेसेज स्क्रीनवर दिसेल.