१ वर्ष फ्री ChatGPT Plus कुणाला मिळणार? कसा करायच अप्लाय?

Published : Nov 19, 2026, 09:15 AM IST

ओपनएआयने (OpenAI) भारतातील पात्र संशोधक आणि पोस्ट-डॉक्टरेट संशोधकांसाठी एक वर्ष फ्री चॅटजीपीटी प्लस (ChatGPT Plus) देण्याची घोषणा केली आहे. यासाठी कोण अप्लाय करू शकतं, तारखा आणि इतर माहिती जाणून घ्या.

PREV
15
एक वर्ष फ्री चॅटजीपीटी प्लस

चॅटजीपीटी प्लस १२ महिने फ्री मिळवा! ओपनएआयने पात्र संशोधकांना हे अ‍ॅक्सेस फ्री देण्याची घोषणा केली आहे. 'चॅटजीपीटी फॉर अ‍ॅकॅडमिक रिसर्चर्स' या योजनेचा भारतात विस्तार झाल्याने, पात्र संशोधकांना १२ महिने फ्री चॅटजीपीटी प्लस मिळेल. जगभरात ५०,००० नवीन ग्रँट्स दिले जातील आणि या योजनेचा फायदा सुमारे २ लाख संशोधकांना होऊ शकतो.

25
तिघांसाठी एकच ऑफर

प्रत्येक निवडलेल्या रिसर्च ग्रुपला ३ चॅटजीपीटी प्लस अकाऊंट्स दिली जातील. मुख्य अर्जदार आणि टीममधील २ पात्र सदस्य एकाच रिसर्च वर्कस्पेसमध्ये चॅटजीपीटी प्लसचा फायदा घेऊ शकतात. चॅटजीपीटीमुळे संशोधकांना रिसर्च मटेरियल शोधणं, हायपोथिसिस तयार करणं, डेटा अ‍ॅनालिसिस, कोडिंग आणि रिसर्च पेपर्स तयार करणं सोपं होऊ शकतं.

35
सर्वांसाठी नाही

या योजनेसाठी फक्त मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थांमधील रिसर्च प्रोफेसर किंवा पोस्ट-डॉक्टरेट संशोधकच अप्लाय करू शकतात. बायोलॉजिकल सायन्सेस, केमिस्ट्री/मटेरियल सायन्स, कॉम्प्युटर सायन्स, अर्थ/स्पेस सायन्सेस, इंजिनीअरिंग, मॅथेमॅटिक्स किंवा फिजिक्स शिकणारे संशोधक यासाठी पात्र आहेत. शिवाय, अर्जदाराने गेल्या ३ वर्षांत त्यांच्या संबंधित क्षेत्रात एक तरी रिसर्च पेपर पब्लिश केलेला असावा. फक्त पात्र असणं म्हणजे तुमची निवड होईलच असं नाही.

45
पहिली संधी ५०,००० जणांना

ओपनएआयने केलेल्या ग्लोबल घोषणेनुसार, २३ नोव्हेंबरपासून अर्ज स्वीकारले जातील. सुरुवातीला अप्लाय करणाऱ्या ५०,००० पात्र अर्जदारांना प्राधान्य दिलं जाईल. पण, भारतीय मीडियानुसार, ३० नोव्हेंबरपासून अप्लाय करता येईल. त्यामुळे भारतीय अर्जदारांनी तारखा नक्की तपासाव्यात. तुमची निवड झाल्यास, तुम्हाला १२ महिने फ्री चॅटजीपीटी प्लस मिळेल.

55
संशोधकांना आणखी काय फायदे मिळणार?

या योजनेत दिलेला डेटा ओपनएआय मॉडेल्सला ट्रेन करण्यासाठी बाय-डिफॉल्ट वापरला जाणार नाही. संशोधनासाठी चॅटजीपीटीचा चांगला वापर कसा करावा, याचं ट्रेनिंग दिलं जाईल. मात्र, ही ऑफर वैयक्तिक अकाऊंट्स अपग्रेड करण्यासाठी नाही. रिसर्चसाठी एक डेडिकेटेड वर्कस्पेस दिलं जाईल आणि अ‍ॅडमिनिस्ट्रेटर्स डेटा कंट्रोल करू शकतील. त्यामुळे अप्लाय करण्यापूर्वी डेटा प्रायव्हसी आणि नियम समजून घेणं महत्त्वाचं आहे.

Utility News (उपयुक्तता बातम्या): Check Latest उपयुक्तता बातम्या थेट in Marathi. Read वैयक्तिक कर्ज, बँकिंग टिप्स, गुंतवणूक, सोने आणि चांदीच्या किंमती बातम्या, ताज्या बातम्या at Asianet Marathi News .
Read more Photos on

Recommended Stories