एक मोठी कंपनी स्विगी आणि झोमॅटोला टक्कर देण्यासाठी सज्ज झाली आहे. ही नवीन सेवा ग्राहकांना ३०% सूट आणि मोफत डिलिव्हरी देईल, तसेच ऑर्डर वेळेवर पोहोचवण्याचा पर्यायही उपलब्ध करून देईल.
नवी दिल्ली: आजकाल कोणतीही वस्तू ऑर्डर केली तर १० मिनिटांत तुमच्यापर्यंत पोहोचते. याचे श्रेय स्विगी, झोमॅटोसारख्या प्लॅटफॉर्मना जाते. सुरुवातीला हॉटेलचे जेवण पुरवठा करणाऱ्या स्विगी आणि झोमॅटो आता दैनंदिन वापराच्या वस्तू १० मिनिटांत पोहोचवण्याचे काम करत आहेत. स्विगी इन्स्टा मार्ट, झोमॅटो ब्लिंक इट द्वारे अन्नधान्यसहित इतर वस्तूंचा पुरवठा करतात. आता एक नवीन कंपनी बाजारात प्रवेश करत असून, 'Coming Soon' असा संदेश दिला आहे.
रिलायन्स, मोर, झोमॅटो, स्विगी इन्स्टा मार्ट, ब्लिंक इटसह काही प्लॅटफॉर्म १० मिनिटांत ऑर्डर पोहोचवण्याचे आश्वासन देतात. आता या यादीत ओलाचा समावेश होत आहे. Ola Grocery हे प्लॅटफॉर्म लाँच झाले आहे.
Ola Grocery चे फायदे काय?
ग्राहकांनी Ola Grocery द्वारे ऑर्डर केल्यास ३०% सूट मिळेल. ग्राहकांना कोणतेही डिलिव्हरी शुल्क न भरता ऑर्डर करता येईल. तुम्हाला हव्या त्या वेळेनुसार ऑर्डर शेड्यूल करण्याचा पर्याय Ola Grocery मध्ये असेल, असे वृत्त आहे.
कंपनीच्या सोशल मीडिया पोस्टनुसार, देशाच्या सर्व भागांत Ola Grocery सुरू होईल. सुरुवातीला महानगरांपासून सुरुवात होईल आणि नंतर टप्प्याटप्प्याने Ola Groceryचा विस्तार होईल, असे समजते. Ola Grocery कधी सुरू होईल या प्रश्नाचे उत्तर 'Coming Soon' असे दिले आहे.
भारतातील क्विक कॉमर्स मार्केट हे जगातील सर्वात मोठे सुरक्षित मार्केट मानले जाते. मोतीलाल डेटा रिपोर्टनुसार, ४६% बाजारपेठेचा वाटा असलेले झोमॅटोचे ब्लिंक इट (Zomato's Blinkit) पहिल्या क्रमांकावर आहे. २९% वाट्यासह झेप्टो (Zepto) दुसऱ्या आणि २५% वाट्यासह स्विगी इन्स्टा मार्ट (Swiggy Instamart) तिसऱ्या क्रमांकावर आहे.
Coming Soon यादीत अमेझॉनही
काही वृत्तांनुसार, ई-कॉमर्स क्षेत्रातील दिग्गज कंपनी अमेझॉनही १० मिनिटांच्या क्विक मार्केटमध्ये प्रवेश करण्याची तयारी करत आहे. २०२५ मध्ये अमेझॉनही क्विक सर्व्हिस सुरू करण्याची शक्यता आहे. जलद डिलिव्हरी सर्व्हिसबद्दल लोकांचा वाढता कल पाहता बाजारपेठ विस्तारत असून नवीन कंपन्यांचा प्रवेश होत आहे.