Numerology: अंकशास्त्रानुसार, काही विशिष्ट तारखांना जन्मलेले लोक सोशल मीडियावर खूप लवकर प्रसिद्ध होऊ शकतात. अगदी कमी वेळेत ते लोकांमध्ये प्रचंड लोकप्रिय होतात.
सध्या सगळीकडे सोशल मीडियाचाच जमाना आहे. पूर्वी लोकांना चांगली नोकरी आणि चांगला पगार हवा असायचा. पण आता सोशल मीडियावर फेमस व्हायचंय, आपल्या पोस्टला जास्त लाईक्स मिळावेत, अशी इच्छा तरुण बाळगून आहेत. पण हे तितकं सोपं नाही. मात्र, अंकशास्त्रानुसार काही तारखांना जन्मलेले लोक हे सहज मिळवतात. चला तर मग पाहूया कोणत्या आहेत त्या तारखा.
24
नंबर 1
कोणत्याही महिन्यात 1,10,19 किंवा 28 तारखेला जन्मलेले लोक अंक १ च्या प्रभावाखाली येतात. सूर्य हा त्यांचा स्वामी ग्रह आहे. हे लोक स्वतःला नेहमी इतरांपेक्षा वेगळं सादर करू पाहतात. ते सहजपणे दुसऱ्यांसारखं वागू शकतात आणि आपल्या बोलण्याने इतरांना आकर्षित करतात. यांनी सोशल मीडियावर व्हिडीओ किंवा फोटो टाकल्यास, ते खूप कमी वेळात प्रसिद्धी मिळवू शकतात.
34
नंबर 3...
कोणत्याही महिन्यात 3,12,21 किंवा 30 तारखेला जन्मलेले लोक अंक 3 च्या प्रभावाखाली येतात. गुरू हा त्यांचा स्वामी ग्रह आहे. हे लोक जन्मतःच खूप हुशार असतात आणि त्यांचा आत्मविश्वासही जबरदस्त असतो. ते आपल्या बोलण्याने सर्वांना सहज आकर्षित करतात. यांनी जर इतरांना प्रेरणा देणारे किंवा ज्ञान वाढवणारे व्हिडीओ बनवले, तर ते सोशल मीडियावर लगेच व्हायरल होऊ शकतात.
अंक 5 कोणत्याही महिन्यात 5,14 किंवा 23 तारखेला जन्मलेले लोक अंक 5 च्या गटात येतात. बुध हा त्यांचा स्वामी ग्रह आहे, जो बुद्धिमत्तेसाठी ओळखला जातो. हे लोक खूप हुशार आणि चपळ असतात. यांनी व्यवसाय, फिटनेस किंवा टेक्नॉलॉजीशी संबंधित व्हिडीओ बनवल्यास ते लवकर प्रसिद्धी मिळवतात. अंक 6: कोणत्याही महिन्यात 6,15 किंवा 24 तारखेला जन्मलेले लोक अंक 6 च्या गटात येतात. शुक्र ग्रह यांच्यावर राज्य करतो, त्यामुळे हे लोक दिसायला खूप आकर्षक असतात. कॅमेऱ्यासमोर ते आत्मविश्वासाने बोलू शकतात. यांनी फॅशन, सौंदर्य, लाइफस्टाइल किंवा मेकअप संबंधित व्हिडीओ बनवल्यास प्रचंड लोकप्रियता मिळवू शकतात.
Utility News (उपयुक्तता बातम्या): Check Latest उपयुक्तता बातम्या थेट in Marathi. Read वैयक्तिक कर्ज, बँकिंग टिप्स, गुंतवणूक, सोने आणि चांदीच्या किंमती बातम्या, ताज्या बातम्या at Asianet Marathi News .