टीझर व्हिडिओनुसार, निसान ग्रॅव्हाइट पाच रंगांमध्ये उपलब्ध असेल. यात एक खास टील (निळा-हिरवा) रंग आहे, जो कंपनीचा हीरो कलर मानला जातो. याशिवाय, ही कार पांढऱ्या, सिल्व्हर, काळ्या आणि ग्रे रंगातही उपलब्ध असेल. ग्रॅव्हाइट रेनो ट्रायबरवर आधारित असली तरी, निसान तिला एक वेगळी ओळख देण्याचा प्रयत्न करत आहे.