UPI Payment Rules: पेट्रोल पंपावर नवा नियम! आता ऑनलाइन पेमेंट चालणार नाही, ग्राहकांचे टेन्शन वाढले

vivek panmand   | CMS
Published : Sep 19, 2026, 09:19 PM IST
UPI Payment Rules: पेट्रोल पंपावर नवा नियम! आता ऑनलाइन पेमेंट चालणार नाही, ग्राहकांचे टेन्शन वाढले

सार

पेट्रोल पंपावर इंधन भरल्यानंतर आता तुम्हाला ऑनलाइन पेमेंट करता येणार नाही. या नव्या नियमामुळे ग्राहकांच्या अडचणी वाढणार आहेत.

१५ ऑक्टोबरपासून २००० रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या UPI पेमेंटवर व्यापाऱ्यांना ०.४ टक्के MDR (मर्चंट डिस्काउंट रेट) शुल्क द्यावे लागणार आहे. हे शुल्क ग्राहकांना द्यावे लागणार नाही, तर ते व्यापाऱ्यांच्या खिशातून जाईल. २००० रुपयांपेक्षा जास्त पेट्रोल-डिझेल किंवा CNG खरेदी केल्यास ५ रुपये फिक्स MDR आकारला जाईल.

पण, या नव्या MDR शुल्कामुळे व्यापारी चांगलेच नाराज झाले आहेत. देशभरात अनेक ठिकाणी याविरोधात संताप पाहायला मिळत आहे. मध्य प्रदेशातील पेट्रोल पंप चालकांनी स्पष्ट केले आहे की, ते १६ ऑक्टोबरपासून २००० रुपयांपेक्षा जास्त रकमेचे UPI पेमेंट घेणार नाहीत.

पेट्रोल पंपावर २००० रुपयांपेक्षा जास्त UPI पेमेंट स्वीकारले जाणार नाही

मध्य प्रदेश पेट्रोल पंप डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष अजय सिंह यांनी सांगितले की, सरकारने MDR शुल्क मागे घेतले नाही, तर १६ ऑक्टोबरपासून पेट्रोल पंपावर २००० रुपयांपेक्षा जास्त UPI पेमेंट न घेण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे.

ते म्हणाले, "या नव्या नियमामुळे एका पेट्रोल पंपाला दर महिन्याला सुमारे १७,७०० रुपयांचे नुकसान सहन करावे लागेल. मध्य प्रदेशात एकूण ४,७०० पेट्रोल पंप आहेत. आमचे मार्जिन आधीच खूप कमी आहे, त्यामुळे आम्ही हा अतिरिक्त खर्च उचलू शकत नाही."

डीलर्सच्या या निर्णयावर CAIT ने चिंता व्यक्त केली आहे. कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (CAIT) या किरकोळ व्यापाऱ्यांच्या संघटनेने शुक्रवारी सांगितले की, मध्य प्रदेशातील पेट्रोल पंप चालकांचा हा निर्णय डिजिटल व्यवहारांसाठी मोठी चिंतेची बाब आहे. CAIT च्या भोपाळ युनिटचे अध्यक्ष आणि मध्य प्रदेशचे मीडिया प्रमुख धर्मेंद्र शर्मा म्हणाले की, या निर्णयाचा फटका राज्यातील सुमारे ४,७०० पेट्रोल पंपांना बसेल. त्यांनी हा मुद्दा UPI व्यवहारांवर प्रस्तावित मर्चंट डिस्काउंट रेट (MDR) लागू करण्याशी जोडला आहे.

धर्मेंद्र शर्मा पुढे म्हणाले की, 'डिजिटल इंडिया', कॅशलेस इकॉनॉमी आणि पारदर्शक व्यवहारांचा मुख्य आधार म्हणून UPI ला अनेक वर्षांपासून प्रोत्साहन दिले जात आहे. पण आता प्रस्तावित MDR मुळे व्यापारी काळजीत पडले आहेत. २००० रुपये किंवा त्याहून अधिक रकमेच्या व्यावसायिक UPI व्यवहारांवर ०.४ टक्के MDR प्रस्तावित करण्यात आला आहे.

याचा सरळ अर्थ असा की, १०,००० रुपयांचे पेमेंट केल्यास ४० रुपये अतिरिक्त खर्च येईल. तर इंधनाच्या बाबतीत, २००० रुपये किंवा त्याहून अधिक रकमेच्या पेमेंटवर ५ रुपये फ्लॅट MDR आकारण्याचा प्रस्ताव आहे.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Tamarind Storage Tips: आजीचा हा सिक्रेट फॉर्म्युला वापरा, चिंच कधीच काळी पडणार नाही
Teeth Whitening Strips: १० मिनिटांत दात चमकणार? टेप लावताच पिवळेपणा गायब, जाणून घ्या सत्य