New Traffic Challan Rules : तुमच्या गाडीवर ट्रॅफिक चालान प्रलंबित आहे? थेट लायसन्स होणार रद्द!

Published : Oct 06, 2025, 03:08 PM IST

New Traffic Challan Rules ः  केंद्रीय परिवहन विभागाचे नवीन नियम ट्रॅफिक चालानाबाबतचे धोरण अधिक कडक करणार आहेत. चालानांच्या मर्यादेबाबत एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. चला, याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया. 

PREV
17
ट्रॅफिक चालानासंबंधी नवीन नियम

हेल्मेट घातले नाही किंवा सिग्नल तोडला तरी, ट्रॅफिक पोलीस फोटो काढून आपोआप चलन पाठवतात. हे आपल्या सर्वांना माहीत आहे. पण काही जण लगेच चालान भरतात, तर काही जण त्याकडे दुर्लक्ष करतात. कधी ट्रॅफिक पोलिसांना सापडल्यास ते जागीच चालान भरायला लावतात. पण प्रलंबित चालानांची संख्या वाढत असल्याने केंद्र सरकार त्यावर तोडगा काढण्यासाठी पावले उचलत आहे.

27
महत्वाचे बदल

सध्या चलन भरण्याची मुदत ९० दिवस आहे, पण ती ४५ दिवसांपर्यंत कमी केली आहे. एकाच वाहनावर पाच किंवा जास्त चलन प्रलंबित असल्यास, संबंधित परिवहन अधिकाऱ्यांना त्या वाहनाचा ड्रायव्हिंग लायसन्स निलंबित करण्याचा अधिकार मिळेल. चलन न भरल्यास पोलीस वाहन जप्त करू शकतात. प्रलंबित चलनांमुळे वाहनावरील सर्व व्यवहार (विक्री, खरेदी, नाव/पत्ता बदल, नूतनीकरण) थांबवले जातील.

37
चलन प्रक्रिया

डिजिटल पायाभूत सुविधांच्या आधारे चलन जारी करणे, पेमेंट आणि अपील प्रक्रिया जलद केली जाईल. चलन जारी झाल्यावर संबंधित अधिकाऱ्यांनी ३ दिवसांत इलेक्ट्रॉनिक नोटीस पाठवणे आवश्यक आहे. प्रत्यक्ष नोटीस पाठवण्यासाठी जास्तीत जास्त १५ दिवसांची मुदत आहे. चलन न भरल्यास वाहन जप्त करण्यासोबतच वाहनाशी संबंधित सर्व व्यवहार थांबवले जातील.

47
चलनासाठी जबाबदार कोण?

आतापर्यंत चलन मुख्यत्वे वाहन मालकाच्या नावावर जारी होत होते. पण नव्या पद्धतीत थेट ड्रायव्हरला जबाबदार धरले जाईल. वाहन मालकाने हे सिद्ध केले की तो गाडी चालवत नव्हता, तर खरा जबाबदार ड्रायव्हर असेल. या नियमांवर कोणाला आक्षेप असल्यास ते स्वीकारले जात आहेत. आक्षेप रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या अतिरिक्त सचिवांना पाठवता येतील. आक्षेप comments-morth@gov.in या ई-मेलवर पाठवू शकता.

57
घ्यायची काळजी

तुमच्या वाहनावर चलन आल्यास ४५ दिवसांच्या आत भरा. वाहन विकण्यापूर्वी किंवा नाव बदलण्यापूर्वी सर्व चलन भरा. वाहनावरील चलनाची माहिती वेळोवेळी ऑनलाइन तपासा. मसुद्यावर आक्षेप असल्यास ई-मेलद्वारे मत कळवा. हे बदल लगेच लागू होणार नाहीत. सध्या हे नियम मसुद्याच्या स्वरूपात असले तरी, लागू झाल्यावर वाहनधारकांवर परिणाम होईल.

67
एआयबेस सीसीटीव्ही

पोलिसांनी ठिकठिकाणी एआयबेस सीसीटीव्ही बसवले आहेत. मुंबई, पुणे, नागपूर यासह इतर मोठ्या शहरांमध्ये असे सीसीटीव्ही बसविण्यात येत आहेत. त्यात कुणी ट्राफिक नियम मोडला तर थेट डिजिटल चलन काढले जाते. ते संबंधित गाडी मालकाच्या नावावर पाठवले जाते.

77
सीसीटीव्हीची संख्या

आधी सीसीटीव्हींची संख्या अगदी मोजकी होती. आता प्रत्येक चौकात सीसीटीव्ही बसविण्यात येत आहेत. त्यामुळे रस्त्यावर घडणारी प्रत्येक गोष्ट त्यात रेकॉर्ड होणार आहे. चालन काढणे पोलिसांना अधिक सोपे जाणार आहे. 

Read more Photos on

Recommended Stories