New Mobile: iPhone 18च्या स्टॅण्डर्ड मॉडेलसाठी आणखी पाहावी लागणार वाट! कारण काय?

Published : Feb 01, 2026, 12:48 PM IST

New Mobile: iPhone 18 सिरीजची वाट पाहणाऱ्या लोकांसाठी एक निराशाजनक बातमी समोर आली आहे. सप्टेंबर 2026 मध्ये सादर होणाऱ्या iPhone 18 सिरीजमध्ये iPhone 18 स्टँडर्ड मॉडेलचा समावेश नसेल. त्यामुळे त्यासाठी आणखी काही काळ वाट बघावी लागेल. 

PREV
16
iPhone 18 सिरीज

ॲपल कंपनी जेव्हा iPhone 18 सिरीजचे स्मार्टफोन लाँच करेल, तेव्हा त्यात iPhone 18 स्टँडर्ड मॉडेलचा समावेश नसेल, असे संकेत मिळत आहेत.

26
iPhone 17 स्टँडर्ड मॉडेल

मागील वर्षी iPhone 17 स्टँडर्ड मॉडेल आणि दोन प्रो व्हेरिएंट्स एकत्र लाँच झाले होते, पण आता iPhone 18 स्टँडर्ड मॉडेल 2026 च्या रिलीझमधून वगळण्यात येणार आहे.

36
स्टँडर्ड मॉडेल

ॲपलच्या मोबाईल सिरीजमध्ये स्टँडर्ड मॉडेल हा मूळ (बेसिक) आयफोन व्हेरिएंट होता. iPhone 15, iPhone 16 आणि iPhone 17 ही त्याची उदाहरणे आहेत.

46
ॲपल iPhone 18 सिरीज सप्टेंबरमध्ये

पण आता समोर आलेल्या लीक्सनुसार, सप्टेंबर 2026 मध्ये जेव्हा ॲपल iPhone 18 सिरीज लाँच करेल, तेव्हा त्यात iPhone 18 स्टँडर्ड मॉडेल नसेल.

56
iPhone 18 Pro आणि iPhone 18 Pro Max

ॲपल सप्टेंबरमध्ये iPhone 18 Pro आणि iPhone 18 Pro Max सोबत iPhone Fold सादर करण्याचा विचार करत आहे. येणारा iPhone Fold हा पहिला फोल्डेबल आयफोन असेल.

66
iPhone Air 2 2027 च्या सुरुवातीला येणार

असे झाल्यास, ॲपल 2027 च्या सुरुवातीला iPhone Air 2 सोबत iPhone 18 बेस मॉडेल बाजारात आणेल. ॲपलच्या नेहमीच्या लाँच पद्धतीपेक्षा हा एक मोठा बदल असेल.

Read more Photos on

Recommended Stories