TMC ACTREC Bharti 2025 : ACTREC मध्ये नवीन 17 पदांसाठी भरती जाहीर, नवी मुंबईत नोकरीची सुवर्णसंधी!

Published : Jul 28, 2025, 07:38 PM IST
TMC ACTREC Bharti 2025

सार

TMC ACTREC Bharti 2025 : टाटा मेमोरियल सेंटर (TMC) च्या ACTREC, नवी मुंबई मध्ये 17 विविध पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 22 ऑगस्ट 2025 आहे. अधिक माहितीसाठी www.actrec.gov.in ला भेट द्या.

TMC ACTREC Bharti 2025 : टाटा मेमोरियल सेंटर (TMC) च्या ॲडव्हान्स सेंटर फॉर ट्रीटमेंट, रिसर्च अँण्ड एज्युकेशन इन कॅन्सर (ACTREC), नवी मुंबईने विविध 17 पदांसाठी नवीन भरती जाहीर केली आहे. आरोग्य आणि संशोधन क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे. तुम्ही जर संबंधित क्षेत्रात अनुभवी आणि पात्र असाल, तर या संधीचा नक्कीच लाभ घ्या.

भरती अंतर्गत पदांची यादी व संख्या:

पदाचे नाव एकूण जागा

असिस्टंट प्रोफेसर ‘E’ (पॅथॉलॉजी) 01

कन्सल्टंट ‘D’ (पॅथॉलॉजी) 02

सायंटिफिक ऑफिसर ‘E’ (इम्युनोलॉजी व इम्युनोजेनेटिक्स) 01

सायंटिफिक ऑफिसर ‘C’ (कॅन्सर पॅथॉलॉजी सेंटर) 01

सायंटिफिक ऑफिसर ‘C’ (IT नेटवर्किंग) 01

सायंटिफिक असिस्टंट ‘B’ (न्युक्लियर मेडिसिन) 03

सायंटिफिक असिस्टंट ‘B’ (कॅन्सर साइटोजेनेटिक लॅब) 01

सायंटिफिक असिस्टंट ‘B’ (प्राणी विज्ञान) 01

को-ऑर्डिनेटर ‘B’ (मेडिकल खरेदी / स्टोअर्स) 01

को-ऑर्डिनेटर ‘B’ (मेडिकल प्रशासन) 01

टेक्निशियन ‘A’ (CRI लॅब) 04

एकूण पदे 17

संस्था:

ACTREC, TMC (अँडव्हान्स सेंटर फॉर ट्रीटमेंट, रिसर्च अँड एज्युकेशन इन कॅन्सर), नवी मुंबई

अर्ज प्रक्रिया:

अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन

अधिकृत संकेतस्थळ: www.actrec.gov.in

ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख: 22 जुलै 2025

अर्ज करण्याची अंतिम तारीख: 22 ऑगस्ट 2025

शैक्षणिक पात्रता:

प्रत्येक पदासाठी वेगवेगळी शैक्षणिक पात्रता लागते. सविस्तर माहिती जाहिरात PDF मध्ये नमूद आहे. कृपया अर्ज करण्यापूर्वी ती काळजीपूर्वक वाचा.

पगार श्रेणी (Consolidated Pay Scale):

पदाचे नाव पगार स्तर

असिस्टंट प्रोफेसर ‘E’ लेव्हल 12 (PB-3, ₹15,600 – ₹39,100 + GP ₹7,600)

कन्सल्टंट ‘D’ लेव्हल 11 (PB-3, ₹15,600 – ₹39,100 + GP ₹6,600)

सायंटिफिक ऑफिसर ‘E’ लेव्हल 12 (PB-3, ₹15,600 – ₹39,100 + GP ₹7,600)

सायंटिफिक ऑफिसर ‘C’ लेव्हल 10 (PB-3, ₹15,600 – ₹39,100 + GP ₹5,400)

सायंटिफिक असिस्टंट ‘B’ / को-ऑर्डिनेटर ‘B’ लेव्हल 6 (PB-2, ₹9,300 – ₹34,800 + GP ₹4,200)

टेक्निशियन ‘A’ लेव्हल 2 (PB-1, ₹5,200 – ₹20,200 + GP ₹1,900)

पात्र उमेदवारांनी ACTREC च्या अधिकृत वेबसाइट https://actrec.gov.in/ वर जाऊन ऑनलाइन अर्ज सादर करावा. अर्ज करण्यापूर्वी, कृपया सर्व तपशिलांसाठी जाहिरात PDF काळजीपूर्वक वाचा.

 

PREV
RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...
Read more Articles on

Recommended Stories

Mahavitaran Bharti 2025 : तरुणांसाठी सुवर्णसंधी! महावितरणमध्ये 300 पदांवर मेगाभरती, दीड लाखांपर्यंत पगार; अर्ज कसा कराल?
हिवाळ्यात त्वचा कोरडी पडल्यास काय करावं, या पर्यायांनी होईल तजेलदार