मुंबई - सोन्याच्या दरात पुन्हा एकदा मोठी वाढ झाली आहे. मुंबईसह विविध शहरांमध्ये २२ आणि २४ कॅरेट सोन्याचे दर लाखावर पोहोचले आहे. ग्राहकांची खरेदी वाढल्याने आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील परिणामांमुळे दर वाढले आहेत. जाणून घ्या मुंबईसह इतर शहरांमधील दर.
सोन्याच्या दरात मोठी वाढ दिसून येत आहे. पण काही दिवसांपूर्वी सोन्याचे दर घसरले होते. तर काही तज्ज्ञांनी सोन्याच्या दरात येत्या काही दिवसांत घट होण्याची शक्यता वर्तवली होती. पण आज झालेली वाढ विक्रमी आहे.