JioPC : सणासुदीत मुकेश अंबानींची मोठी भेट, आता स्वस्तात मिळणार 'जिओ पीसी'

Published : Oct 12, 2026, 10:29 PM IST
JioPC : सणासुदीत मुकेश अंबानींची मोठी भेट, आता स्वस्तात मिळणार 'जिओ पीसी'

सार

सणासुदीच्या काळात मुकेश अंबानींच्या रिलायन्स जिओने ग्राहकांसाठी 'जिओ पीसी' ही नवी क्लाउड कम्प्युटिंग सेवा आणली आहे. अगदी कमी किंमतीत मिळणाऱ्या या नव्या सुविधेमुळे जुना टीव्ही किंवा लॅपटॉपही सुपरफास्ट पीसीसारखा काम करेल.

मुंबई : रिलायन्स जिओने ग्राहकांसाठी नेहमीच नवनवीन ऑफर्स आणल्या आहेत. आता सणासुदीच्या मुहूर्तावर जिओने विद्यार्थी आणि शैक्षणिक संस्थांसाठी एक भन्नाट भेट आणली आहे. जिओने अत्यंत कमी किंमतीत 'जिओ पीसी' (JioPC) ही सुविधा लाँच केली आहे. यासाठी तुम्हाला नवा कम्प्युटर विकत घेण्याची अजिबात गरज नाही. ही एक क्लाउड-बेस्ड कम्प्युटिंग सिस्टीम आहे. यामुळे तुमच्या जुन्या लॅपटॉप किंवा डेस्कटॉपचा वेग आणि आयुष्य दोन्ही वाढेल.

एवढंच नाही, तर जिओ सेट-टॉप बॉक्सच्या मदतीने तुम्ही तुमच्या घरातील टीव्हीलाही पर्सनल कम्प्युटर (PC) बनवू शकता. वेब ब्राउझरच्या माध्यमातून तुम्ही या संपूर्ण कम्प्युटिंग सिस्टीमचा वापर करू शकता.

जिओ पीसीची सर्वात मोठी खासियत म्हणजे तुम्ही हे कोणत्याही स्क्रीनवर किंवा सिस्टीमवर वापरू शकता. हे कोणत्याही एका डिव्हाइसपुरते मर्यादित नाही. त्यामुळे जे विद्यार्थी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन अभ्यास करतात, त्यांच्यासाठी हे खूप फायद्याचे आहे. तुम्ही तुमचे अकाउंट जुना कम्प्युटर, जिओ सेट-टॉप बॉक्स जोडलेला टीव्ही किंवा कोणत्याही मॉनिटरवर लॉग इन करून वापरू शकता.

फक्त जिओ युजर्ससाठी नाही

सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, जिओ पीसी फक्त जिओच्या ग्राहकांसाठीच मर्यादित नाही. जर तुमच्याकडे जिओ पीसीचे अ‍ॅक्टिव्ह सबस्क्रिप्शन असेल, तर तुम्ही कोणत्याही कंपनीच्या ब्रॉडबँड किंवा इंटरनेट कनेक्शनवर ब्राउझरच्या मदतीने जिओ पीसी वापरू शकता.

प्लॅन्स आणि किंमत

  • २ महिने - १००० रुपये (8GB RAM / 500GB) आणि १२०० रुपये (16GB RAM / 1TB)
  • ५ महिने - २००० रुपये (8GB RAM / 500GB) आणि २५०० रुपये (16GB RAM / 1TB)
  • १०+२ महिने - ४००० रुपये (8GB RAM / 500GB) आणि ५००० रुपये (16GB RAM / 1TB)

जिओ फायबर किंवा जिओ एअरफायबर (JioHome) वापरणाऱ्या ग्राहकांसाठी यात आणखी एक फायदा आहे. या ग्राहकांना दर महिन्याला १०० रुपयांचे जिओ होम व्हाउचर मिळेल, जे ते त्यांच्या ब्रॉडबँड बिलासाठी वापरू शकतात. यामुळे जिओ पीसीचा महिन्याचा खर्च आणखी कमी होतो.

विद्यार्थ्यांसाठी तर हे एक वरदानच आहे. हायब्रिड क्लासेस, शैक्षणिक अ‍ॅप्स, कोडिंग, डिझायनिंग, रिसर्च आणि जनरेटिव्ह एआय (AI) यांसारख्या जड कामांसाठी लागणारी ताकद जिओ पीसी सहज देतो. आजकाल शिक्षणात तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे, अशा वेळी नवा महागडा लॅपटॉप घेण्याऐवजी विद्यार्थी जुन्याच डिव्हाइसवर जिओ पीसीच्या मदतीने हाय-स्पीड कम्प्युटिंगचा अनुभव घेऊ शकतात.

जिओ पीसीमध्ये उबंटू (लिनक्स) ऑपरेटिंग सिस्टीमचा इंटरफेस मिळतो. यात तुम्ही वेब ब्राउझरच्या मदतीने लिब्रे ऑफिस (Libre Office) आणि मायक्रोसॉफ्ट ३६५ (Microsoft 365) सारखे ऑनलाइन अ‍ॅप्स वापरू शकता. तसेच हे अ‍ॅडोब एक्सप्रेसलाही (Adobe Express) सपोर्ट करते. सामान्य कम्प्युटरमध्ये डेटा हार्ड डिस्कवर सेव्ह होतो, पण जिओ पीसीमध्ये तुमचा सगळा डेटा एंटरप्राइज-ग्रेड क्लाउड स्टोरेजवर सुरक्षित राहतो. यात डिझास्टर रिकव्हरी सिस्टीम असल्याने तुमचा डेटा कधीही गहाळ होण्याची भीती नाही.

PREV
Utility News (उपयुक्तता बातम्या): Check Latest उपयुक्तता बातम्या थेट in Marathi. Read वैयक्तिक कर्ज, बँकिंग टिप्स, गुंतवणूक, सोने आणि चांदीच्या किंमती बातम्या, ताज्या बातम्या at Asianet Marathi News .
Read more Articles on

Recommended Stories

Budget Mileage Bikes : 70 किमी मायलेज, किंमत फक्त 58,850 रुपये; ऑफिससाठी बेस्ट 6 बाईक्स
EV Battery Replacement Cost : इलेक्ट्रिक कारची बॅटरी बदलायला किती खर्च येतो?