Money Making ideas: AI चा वापर करून पैसे कमावण्याचे 5 मार्ग कोणते? जाणून घ्या

Published : Jan 27, 2026, 01:58 PM IST

Money Making Ideas: आजच्या काळात हार्ड वर्क नाही, तर स्मार्ट वर्क करूनच जास्त पैसे कमावता येतात. त्यामुळे नोकरी करणारे आणि शिकणारे तरुण AI चा वापर केवळ माहिती मिळवण्यासाठीच नाही, तर पैसे कमावण्यासाठीही करू शकतात. याबद्दल अधिक जाणून घेऊयात.   

PREV
16
AI च्या मदतीने पैसे कमवा...

Make Money With AI: आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या (AI) आगमनाने उत्पन्नाचे नवीन मार्ग खुले झाले आहेत. त्यामुळे, AI ला केवळ एक आधुनिक तंत्रज्ञान म्हणून न पाहता कमाईचे साधन बनवा. विद्यार्थी, नोकरदार एवढेच नाही, तर सामान्य लोकही कोणत्याही गुंतवणुकीशिवाय AI च्या मदतीने पैसे कमवू शकतात. अशा 5 सोप्या आणि विश्वासार्ह मार्गांबद्दल येथे जाणून घ्या.

26
1. कंटेंट तयार करा

आर्टिफिशियल इंटेलिजन्स चॅटबॉट्स वापरून कंटेंट तयार करता येतो. म्हणजे आपल्याला हवी असलेली माहिती देऊन वेबसाइट किंवा व्हिडिओसाठी कंटेंट तयार करण्यास सांगितल्यास AI चॅटबॉट्स तो तयार करून देतात. त्यात स्वतःचे शब्द आणि मानवी स्पर्श जोडल्यास उत्तम कंटेंट तयार होतो. मात्र, AI ची माहिती कॉपी-पेस्ट केल्याने कंटेंट दर्जेदार होत नाही, त्यात अनुभव जोडावाच लागतो. हे मीडिया आणि चित्रपट क्षेत्रातील लोकांसाठी उपयुक्त आहे.

36
2. कॅमेऱ्यासमोर न येता व्हिडिओ बनवा

अनेकजण उत्तम बोलू शकतात, माहिती चांगल्या प्रकारे समजावून सांगू शकतात, पण कॅमेऱ्यासमोर येण्यास घाबरतात. असे लोक AI वापरून फेसलेस व्हिडिओ तयार करू शकतात. असे व्हिडिओ YouTube, Instagram वर पोस्ट करून केवळ फॉलोअर्सच नाही, तर पैसेही कमावता येतात.

46
3. रेझ्युमे तयार करणे

गरजू लोकांसाठी AI वापरून रेझ्युमे तयार करून देणे हा देखील एक चांगला उत्पन्नाचा मार्ग आहे. कंपन्यांच्या ऑटोमेटेड सिस्टीमनुसार रेझ्युमे सुधारता येतो. यासाठी थोडा अनुभव आणि रिसर्च आवश्यक आहे. कोणती कंपनी कोणत्या गुणवत्तेचे उमेदवार शोधत आहे हे जाणून घेऊन, त्यानुसार AI ला कमांड देऊन रेझ्युमे तयार करता येतो.

56
4. व्यवसायासाठी जाहिराती

छोट्या व्यवसायांना सोशल मीडिया कंटेंटची खूप गरज असते. त्यांच्यासाठी AI च्या मदतीने कॅप्शन आणि रिल्सच्या आयडिया तयार करता येतात. स्थानिक भाषा आणि ट्रेंड्स समजून घेऊन पोस्ट केल्यास चांगले परिणाम मिळतात. काहीजण आधीच अशा AI जाहिरात व्हिडिओंद्वारे आपला व्यवसाय वाढवत आहेत. 

66
5. ब्लॉग आणि वेबसाइट्स चालवा

आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने ब्लॉग किंवा वेबसाइट चालवून दीर्घकाळ उत्पन्न मिळवता येते. AI द्वारे रिसर्च करून आणि स्वतःच्या अनुभवाने लेख लिहिणे किंवा व्हिडिओ बनवणे आवश्यक आहे. आरोग्य, शिक्षण यांसारख्या विषयांना जास्त मागणी आहे. यावर थोडे ज्ञान असले तरी AI च्या मदतीने संपूर्ण माहिती मिळवता येते. ही माहिती विविध मार्गांनी लोकांपर्यंत पोहोचवून उत्पन्न मिळवता येते.

Read more Photos on

Recommended Stories