Mobile Market: विवो लवकरच आपल्या X-सीरिजमध्ये एक नवीन प्रीमियम स्मार्टफोन, Vivo X300 FE, लाँच करणार आहे. हा फोन Qualcomm Snapdragon 8 Gen 5 प्रोसेसर, 6500mAh क्षमतेची दमदार बॅटरी आणि 50MP मुख्य कॅमेरा अशा जबरदस्त फीचर्ससह येणार असल्याची चर्चा आहे.
भारतीय स्मार्टफोन बाजारात लवकरच एका नवीन प्रीमियम मॉडेलची एन्ट्री होणार आहे. चीनची टेक कंपनी विवो आपल्या X-सीरिजमध्ये Vivo X300 FE हा नवीन स्मार्टफोन लाँच करण्याच्या तयारीत आहे. हा फोन बाजारात आधीपासून असलेल्या X300 आणि X300 Pro मॉडेल्सच्या पंक्तीत बसेल. कंपनीने अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केली नसली तरी, गीकबेंच लिस्टिंगवर दिसल्याने याच्या लाँचच्या चर्चांना उधाण आलं आहे. रिपोर्ट्सनुसार, Vivo X300 FE मध्ये 6.31-इंचाचा LPTO AMOLED डिस्प्ले असू शकतो.
24
Vivo X300 FE specifications
या फोनचा डिस्प्ले 120Hz अॅडाप्टिव्ह रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. तसेच, 5,000 निट्सपर्यंत ब्राईटनेस असल्यामुळे भर उन्हातही स्क्रीन स्पष्ट दिसेल. याला IP68 आणि IP69 रेटिंग मिळाल्याने हा फोन पाणी आणि धूळ यांपासून सुरक्षित राहील. यात Qualcomm Snapdragon 8 Gen 5 प्रोसेसर वापरला जाऊ शकतो. 12GB रॅममुळे मल्टी-टास्किंग आणि गेमिंगचा अनुभव एकदम स्मूथ असेल. फोनमध्ये 6500mAh क्षमतेची बॅटरी आणि 90W फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळेल, ज्यामुळे फोन काही मिनिटांतच फुल चार्ज होईल.
34
Vivo X300 FE camera specs
कॅमेरा हे या स्मार्टफोनचे मुख्य आकर्षण असेल. याच्या मागील बाजूस ट्रिपल कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो. यात 50-मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा, 50-मेगापिक्सलचा पेरिस्कोप टेलीफोटो लेन्स (3x ऑप्टिकल झूमसह) आणि 8-मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड कॅमेरा यांचा समावेश असेल. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी यात 50-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला जाईल, अशी माहिती समोर आली आहे.
हा फोन कूल लिलाक, ग्रॅफाइट ब्लॅक आणि मूनलाइट व्हाइट या तीन रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध होईल. भारतात हा फोन मे 2026 च्या पहिल्या पंधरवड्यात लाँच होण्याची शक्यता आहे. लीक झालेल्या माहितीनुसार, या फोनची सुरुवातीची किंमत 64,999 रुपये असू शकते. अधिकृत घोषणा बाकी असली तरी, इतक्या दमदार फीचर्समुळे हा फोन बाजारात नक्कीच धुमाकूळ घालेल, असा अंदाज टेक विश्लेषक वर्तवत आहेत.