Mobile Market: Redmi ने आपल्या K-सीरीजमध्ये नवीन K90 Max स्मार्टफोन लाँच करून पुन्हा एकदा सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. जबरदस्त परफॉर्मन्स आणि गेमिंगचा अनुभव लक्षात घेऊन तयार केलेला हा फोन अनेक दमदार फीचर्ससह येतोय.
Redmi ने चिनी स्मार्टफोन बाजारात पुन्हा एकदा धुमाकूळ घालण्यासाठी आपला नवीन K90 Max मॉडेल लाँच केला आहे. K-सीरीजमध्ये K90 आणि K90 प्रो मॅक्स आधीच उपलब्ध आहेत, पण या नव्या फोनला चाहते 'परफॉर्मन्स किंग' म्हणत आहेत. हा फोन खास करून गेमर्स आणि हेवी युजर्ससाठी बनवला आहे. यात 6.83-इंचाचा 1.5K डिस्प्ले आहे.
24
मीडियाटेक डायमेन्सिटी 9500
या फोनचा 165Hz रिफ्रेश रेट, 480Hz टच सॅम्पलिंग रेट आणि 3500 निट्सची ब्राईटनेस स्क्रिनला खूप स्मूथ आणि चमकदार बनवतात. HDR10+ आणि डॉल्बी व्हिजन सपोर्टमुळे व्हिडिओ आणि गेमिंगचा अनुभव आणखी जबरदस्त होतो. परफॉर्मन्ससाठी यात मीडियाटेक डायमेन्सिटी 9500 चिपसेट वापरला आहे.
34
अॅक्टिव्ह कूलिंग फॅन
यात 16GB LPDDR5x रॅम आणि 1TB पर्यंत UFS 4.0 स्टोरेज मिळतं. गेमिंगचा अनुभव सुधारण्यासाठी D2 डिस्प्ले चिप, मोठी कूलिंग सिस्टीम आणि एक अॅक्टिव्ह कूलिंग फॅनसुद्धा दिला आहे. त्यामुळे जास्त वेळ वापरूनही फोन गरम होणार नाही. कॅमेऱ्याबद्दल बोलायचं झाल्यास, यात 50MP मुख्य कॅमेरा आणि 8MP सेकंडरी लेन्सचा ड्युअल रिअर सेटअप आहे. समोर 20MP सेल्फी कॅमेरा दिला आहे.
या फोनमध्ये Bose कंपनीसोबत मिळून ट्यून केलेले स्टिरिओ स्पीकर्स आहेत, ज्यामुळे ऑडिओचा अनुभवही उत्तम मिळतो. पण या फोनचं मुख्य आकर्षण आहे त्याची 8550mAh क्षमतेची बॅटरी. याला 100W फास्ट चार्जिंग आणि 22.5W रिव्हर्स चार्जिंगचा सपोर्ट आहे. फोनला IP66, IP68 आणि IP69 रेटिंग मिळालं आहे. याची किंमत सुमारे 41,000 ते 64,000 रुपये असेल असं सांगितलं जातंय. स्पेस सिल्व्हर, शॅडो ब्लॅक आणि स्काय ब्लू रंगांमध्ये उपलब्ध असलेला हा फोन हाय-एंड युजर्सना नक्कीच आकर्षित करेल.