Maruti 800 wins FIVA Award: एकेकाळी भारतात कार क्रांती घडवणारी मारुती 800 आता जागतिक स्तरावर सन्मानित झाली आहे. हा प्रतिष्ठित 'FIVA वर्ल्ड व्हेईकल हेरिटेज अवॉर्ड' मिळवणारी ती भारताची पहिलीच कार ठरली आहे.
80 च्या दशकात भारतातील ऑटोमोबाईल क्षेत्राचा इतिहास बदलून कार क्रांती घडवणारी मारुती 800 आता जागतिक स्तरावर एक दुर्मीळ सन्मान मिळवून आली आहे.
होय, एकेकाळी सामान्य माणूस कार घेण्याचा विचार करत असेल तर त्याच्या मनात पहिली मारुती 800 च येत असे. प्रत्येक भारतीयाला ही कार घेण्याची स्वप्न पडायचे. अशी कार क्रांती घडवणाऱ्या मारुती 800 ला आता फेडरेशन इंटरनॅशनल डेस व्हेइकल्स अँटिक्स (FIVA) कडून 'वर्ल्ड व्हेईकल हेरिटेज अवॉर्ड' मिळाला आहे.
26
सामान्य भारतीयाचे जीवन बदलणारी कार
हा सन्मान मिळवणारी ही भारताची पहिली आणि एकमेव कार आहे. हा पुरस्कार आंतरराष्ट्रीय ऐतिहासिक वाहनांचा संघ FIVA कडून दिला जातो. लोकांचा प्रवास आणि वाहतूक व्यवस्थेवर दीर्घकालीन परिणाम करणाऱ्या कार्सना हा पुरस्कार दिला जातो.
मारुती सुझुकी कंपनीच्या मते, मारुती 800 ही केवळ एक कार नव्हती, तर सामान्य लोकांसाठी वैयक्तिक वाहतूक व्यवस्था होती. तोपर्यंत भारतीय सार्वजनिक वाहतुकीवरच अवलंबून होते. पण मारुती 800 आल्यानंतर लोकांची दररोजच्या प्रवासाची पद्धतच बदलली. या कारने जेवढा फायदा भारतीयांच्या वैयक्तिक वाहतुकीसाठी केला, तेवढा कोणत्याही दुसऱ्या कारने केला नाही. म्हणूनच या प्रभावामुळे मारुती 800 ला हा पुरस्कार मिळाला आणि त्याचे मूल्य वाढले.
36
मारुती 800: सामान्य माणसाची कार
80 च्या दशकात अनेक मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी कार असणे हे एक मोठे स्वप्न होते. नवीन घर आणि घरासमोर कार असण्याची स्वप्ने ते पाहायचे. त्यावेळी आपण फक्त चित्रपटांमध्येच कार पाहायचो. पण त्याच वेळी मारुती 800 भारतीय बाजारात आली आणि त्यानंतर जी कार क्रांती झाली ती सर्वांना माहीतच आहे. मारुती कार आल्यानंतर अनेकांचे घरासमोर कार उभी करण्याचे स्वप्न पूर्ण झाले. ती फार महागही नव्हती. ती त्यावेळी सामान्य माणसाची कार असल्यामुळेच मारुती 800 ने भारतीय कारच्या इतिहासात एक विशेष स्थान निर्माण केले आहे.
अनेक देशांच्या कार्सना मागे टाकत मारुती 800 ठरली विजेती
या प्रतिष्ठित पुरस्कारासाठी जगभरातील 21 ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व असलेल्या कार्स स्पर्धेत होत्या. या यादीत अमेरिका, ब्राझील, जर्मनी, फ्रान्स, ऑस्ट्रिया, स्लोव्हेनिया यांसारख्या अनेक देशांच्या कार्स आणि इतर वाहने स्पर्धेत होती. पण त्या सर्वांवर मात करत मारुती 800 ला हा सन्मान मिळाला, याचा भारतीय म्हणून आपल्याला नक्कीच अभिमान वाटायला हवा.
56
FIVA पुरस्कार मिळवणारी भारताची एकमेव कार मारुती 800
FIVA पुरस्कार मिळवणारी भारताची पहिली आणि एकमेव कार ठरण्याचा मान मारुती 800 ला मिळाला आहे. देशातील वैयक्तिक वाहतूक क्षेत्रावर या कारने टाकलेल्या महत्त्वपूर्ण प्रभावाची ही आंतरराष्ट्रीय दखल आहे.
66
भारतीय ऑटोमोबाईल इतिहासात विशेष स्थान
त्याकाळी जर तुमच्या घरच्यांकडे मारुती 800 असती तर समाजात तुमची प्रतिष्ठा खूप वाढायची. आजही अनेक ज्येष्ठ नागरिकांना मारुती 800 कार कुठेतरी दिसली की जुन्या आठवणी ताज्या होतात. जुन्या प्रवासाच्या आठवणी पुन्हा पुन्हा डोळ्यांसमोर येतात. अनेक पिढ्यांपासून भारतीय रस्त्यांवर दिसणाऱ्या या कारला आज जागतिक स्तरावर विशेष सन्मान मिळाला आहे.
Utility News (उपयुक्तता बातम्या): Check Latest उपयुक्तता बातम्या थेट in Marathi. Read वैयक्तिक कर्ज, बँकिंग टिप्स, गुंतवणूक, सोने आणि चांदीच्या किंमती बातम्या, ताज्या बातम्या at Asianet Marathi News .