LIC चा धमाका! सुरक्षित भविष्यासाठी ५ नवीन जबरदस्त योजना लाँच; बचत, विमा आणि पेन्शनचा एकाच ठिकाणी लाभ

Published : Jan 03, 2026, 08:02 PM IST

LIC New Plans 2025 : भारतीय जीवन विमा महामंडळाने (LIC) २०२५-२६ साठी ५ नवीन योजना आणल्या आहेत. या योजना गुंतवणूक, विमा संरक्षण, कमी उत्पन्न गट, महिला, निवृत्तीनंतरच्या पेन्शनच्या गरजा पूर्ण करतात. प्रत्येक वयोगटासाठी, गरजेसाठी विशेष प्लॅन उपलब्ध आहे.

PREV
17
LIC चा धमाका! सुरक्षित भविष्यासाठी ५ नवीन जबरदस्त योजना लाँच

मुंबई : भारतीय जीवन विमा महामंडळाने (LIC) २०२५-२६ या वर्षात सर्वसामान्यांच्या गरजा लक्षात घेऊन ५ नवीन विशेष योजना बाजारात आणल्या आहेत. तुम्ही गुंतवणुकीसाठी नवा पर्याय शोधत असाल, कुटुंबाला सुरक्षा कवच देऊ इच्छित असाल किंवा निवृत्तीनंतरच्या पेन्शनची चिंता करत असाल, तर LIC कडे आता प्रत्येक वयोगटासाठी एक मास्टर प्लॅन तयार आहे. 

27
१. LIC प्रोटेक्शन प्लस (प्लॅन ८८६): विम्यासह गुंतवणुकीची संधी

हा एक 'लिंक्ड सेव्हिंग प्लॅन' आहे. म्हणजे यात तुम्हाला विम्याचे संरक्षण तर मिळतेच, शिवाय तुमचे पैसे शेअर मार्केटशी संबंधित फंडात गुंतवले जातात.

खासियत: ५ वर्षांनंतर गरज पडल्यास तुम्ही पैसे काढू शकता.

वय: १८ ते ६५ वर्षे.

फायदा: विमा संरक्षण आणि गुंतवणुकीवर मिळणारा परतावा एकाच प्लॅनमध्ये. 

37
२. LIC बिमा कवच (प्लॅन ८८७): कुटुंबासाठी पक्के सुरक्षा कवच

हा एक शुद्ध जीवन विमा (Pure Protection Plan) आहे. पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास कुटुंबाला हमी दिलेली मोठी रक्कम मिळते.

पर्याय: मृत्यू लाभ (Death Benefit) एकरकमी किंवा हप्त्यांमध्ये घेण्याची सोय.

फायदा: कमी प्रीमियममध्ये जास्तीत जास्त विमा संरक्षण. 

47
३. LIC जन सुरक्षा (प्लॅन ८८०): सर्वसामान्यांचा आधार

कमी उत्पन्न असलेल्या लोकांसाठी हा 'मायक्रो इन्शुरन्स' प्लॅन अत्यंत फायदेशीर आहे.

खासियत: यासाठी कोणत्याही वैद्यकीय चाचणीची (Medical Test) गरज नाही.

फायदा: पॉलिसी पूर्ण झाल्यावर गॅरंटीड मॅच्युरिटी रक्कम मिळते आणि जोखीमही कव्हर होते. 

57
४. LIC बिमा लक्ष्मी (प्लॅन ८८१): खास महिलांसाठी भेट

महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी LIC ने ही योजना आणली आहे.

मनी-बॅक सुविधा: दर २ किंवा ४ वर्षांनी ठराविक रक्कम परत मिळते.

आरोग्य कवच: यामध्ये गंभीर आजारांसाठी विशेष कव्हर आणि मॅच्युरिटी बेनिफिट उपलब्ध आहे. 

67
५. LIC स्मार्ट पेन्शन (प्लॅन ८७९): निवृत्तीनंतरचे टेन्शन खल्लास

ही एक 'इमिजिएट अ‍ॅन्युइटी' म्हणजे तात्काळ पेन्शन देणारी योजना आहे.

कसे काम करते: एकरकमी रक्कम जमा करा आणि पुढच्या महिन्यापासून पेन्शन सुरू करा.

पर्याय: तुम्ही एकट्यासाठी किंवा पती-पत्नीसाठी (Joint Life) पेन्शनचा पर्याय निवडू शकता. 

77
का निवडाव्यात या योजना?

बदलत्या आर्थिक गरजा आणि नवीन कर प्रणाली लक्षात घेऊन LIC ने हे प्लॅन डिझाइन केले आहेत. यामध्ये गुंतवणुकीची सुरक्षा, कर सवलत आणि भविष्यातील आर्थिक नियोजनाचा अचूक ताळमेळ साधण्यात आला आहे.

RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...
Read more Photos on

Recommended Stories