LIC: निवृत्तीनंतर नियमित उत्पन्न मिळावं, अशी प्रत्येकाची इच्छा असते. यासाठी अनेक प्रकारच्या योजना उपलब्ध आहेत. त्यापैकीच एक म्हणजे एलआयसीची जीवन शांती योजना. चला तर मग, ही योजना नेमकी काय आहे आणि तिचे फायदे काय आहेत, ते जाणून घेऊया.
न्यू जीवन शांती हा एलआयसीचा एक डिफर्ड ॲन्युइटी पेन्शन प्लॅन आहे. या योजनेत तुम्ही एकदाच (एक रकमी) पैसे गुंतवता. ठराविक कालावधीनंतर तुम्हाला दरमहा किंवा वर्षातून एकदा पेन्शन मिळायला सुरुवात होते. हा प्लॅन शेअर बाजाराशी संबंधित नाही. त्यामुळे यात गुंतवणुकीचा धोका खूप कमी असतो.
25
या योजनेतील पर्याय आणि लॉक-इन कालावधी
या प्लॅनमध्ये ५ वर्षांचा लॉक-इन कालावधी असतो. म्हणजे गुंतवणूक केल्यानंतर पाच वर्षांपर्यंत तुम्ही ते पैसे काढू शकत नाही.
या योजनेत दोन प्रकारचे पर्याय आहेत:
सिंगल लाईफ डिफर्ड ॲन्युइटी
जॉइंट लाईफ डिफर्ड ॲन्युइटी
ही योजना एका व्यक्तीच्या किंवा पती-पत्नीच्या नावे घेता येते.
35
पेन्शन कशी मिळते?
ही योजना घेतल्यानंतर पॉलिसीधारकाला आयुष्यभर पेन्शन मिळते. सिंगल लाईफ प्लॅनमध्ये पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास, गुंतवलेली रक्कम नॉमिनीला दिली जाते. जॉइंट लाईफ प्लॅनमध्ये एकाचा मृत्यू झाल्यास, दुसऱ्या व्यक्तीला पेन्शन सुरू राहते. दोघांचाही मृत्यू झाल्यास, संपूर्ण रक्कम नॉमिनीला मिळते. पेन्शन मासिक, त्रैमासिक, सहामाही किंवा वार्षिक घेण्याचा पर्याय आहे.
जोखीम संरक्षण नसले तरी, स्थिर उत्पन्न मिळवू इच्छिणाऱ्यांसाठी हा एक चांगला पर्याय आहे.
55
वर्षाला एक लाख रुपये पेन्शन कशी मिळेल?
उदाहरणार्थ, ५५ वर्षांच्या व्यक्तीने या योजनेत ११ लाख रुपये गुंतवल्यास, ५ वर्षांनंतर पेन्शन सुरू होईल. तेव्हा त्याला वर्षाला सुमारे १,०१,८८० रुपये पेन्शन मिळेल. म्हणजेच दरमहा सुमारे ८,१४९ रुपये. सहा महिन्यांतून एकदा ४९,९११ रुपये पेन्शन मिळेल.