Ladki Bahin Yojana : 'लाडकी बहीण' योजनेत 26 लाखांहून अधिक अपात्र लाभार्थी; जुलैचे पैसे मिळणार की नाही?

Published : Jul 28, 2025, 06:29 PM IST
Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana:

सार

Ladki Bahin Yojana : महाराष्ट्र सरकारच्या 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेत 26.34 लाख अपात्र लाभार्थी आढळून आले आहेत. जून 2025 पासून त्यांचा लाभ स्थगित करण्यात आला असून, जिल्हाधिकारी स्तरावर पुन्हा तपासणी केली जाईल.

Ladki Bahin Yojana : राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेत मोठा घोटाळा झाल्याचे समोर आले आहे! तब्बल 26.34 लाख अपात्र लाभार्थी या योजनेचा गैरफायदा घेत असल्याची धक्कादायक बाब महिला व बालविकास विभागाच्या तपासणीत उघड झाली आहे. यावर तातडीने कारवाई करत, या अपात्र लाभार्थ्यांचा लाभ जून 2025 पासून स्थगित करण्यात आल्याचे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले आहे.

'लाडकी बहीण' योजनेत घोळ नेमका काय?

'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेचे खरे पात्र लाभार्थी शोधण्यासाठी महिला व बालविकास विभागाने एक विशेष मोहीम हाती घेतली होती. यासाठी शासनाच्या विविध विभागांकडून माहिती मागवण्यात आली. माहिती व तंत्रज्ञान विभागाने सादर केलेल्या अहवालातून हे धक्कादायक वास्तव समोर आले आहे की, 26.34 लाख लाभार्थी अपात्र असूनही या योजनेचा लाभ घेत होते.

'लाडक्या बहिणी'साठी पुरुषांनीही केले अर्ज!

यापूर्वी काही माध्यमांनी या संदर्भात वृत्त दिले होते की, 'लाडकी बहीण' योजनेचा लाभ काही पुरुषांनीही घेतला होता. याव्यतिरिक्त, अनेक अर्जदार एकापेक्षा जास्त योजनांचा लाभ घेत होते, तर काही कुटुंबांमध्ये दोनपेक्षा जास्त लाभार्थी आढळले. अशा अनेक अनियमितता या तपासणीत निदर्शनास आल्या आहेत.

पुरुषांकडून होणारी ही फसवणूक समोर आल्यानंतर, सरकारने तातडीने कठोर पाऊले उचलत 26.34 लाख अपात्र लाभार्थ्यांचा लाभ जून 2025 पासून थांबवण्याचा निर्णय घेतला. दुसरीकडे, 2.25 कोटी पात्र लाभार्थ्यांना मात्र योजनेचा सन्माननिधी वितरित करण्यात आला आहे, असे मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले.

तात्पुरती स्थगिती, पुन्हा होणार तपासणी!

ज्यांच्या लाभाला स्थगिती देण्यात आली आहे, अशा अर्जांची जिल्हाधिकारी स्तरावर पुन्हा सखोल शहानिशा करण्यात येणार आहे. या तपासणीनंतर जे अर्जदार खरोखर पात्र ठरतील, त्यांना पुन्हा योजनेचा लाभ दिला जाईल. ही केवळ तात्पुरती स्थगिती असून, अंतिम निर्णय तपासणी पूर्ण झाल्यानंतरच घेतला जाईल.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत दिशाभूल करून चुकीच्या पद्धतीने लाभ घेतलेल्या बनावट लाभार्थ्यांविरोधात कारवाई करायची की नाही, यावर देखील लवकरच निर्णय घेतला जाईल. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्याशी चर्चा करून योग्य तो निर्णय घेतला जाईल, अशी माहिती मंत्री अदिती तटकरे यांनी दिली.

या गोंधळामुळे पात्र लाभार्थ्यांच्या मनात जुलै महिन्यातील निधी मिळण्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सरकार यावर काय उपाययोजना करते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

PREV
RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...
Read more Articles on

Recommended Stories

डायबिटिसला चुटकीत लावा पळवून, या भाजीचं लोणचं बनवा १५ मिनिटात
Kia च्या नवीन 'व्हिजन मेटा टुरिस्मो' कॉन्सेप्टचा टीझर रिलीज, हा स्टिंगरचा इलेक्ट्रिक उत्तराधिकारी?