Herald E Bike Success Story : 3500 रुपये पगार ते 1.5 कोटींची उलाढाल... बायकोच्या बचतीतून उभारलं 'हेराल्ड ई-बाईक'चं साम्राज्य

Published : Oct 19, 2026, 11:06 PM IST

महिन्याला अवघ्या ३,५०० रुपये पगारावर काम सुरू करणारा तरुण आज दर महिन्याला १.५ कोटींची कमाई करतोय! 'हेराल्ड ई-बाईक'चे संस्थापक कृष्णा ग्रोव्हर यांचा हा प्रेरणादायी प्रवास…

PREV
15
३,५०० रुपये पगार ते १.५ कोटींची उलाढाल...

एकेकाळी महिन्याला फक्त ३,५०० रुपये पगारावर काम करणारा माणूस आज दर महिन्याला १.५ कोटी रुपयांची उलाढाल करणारं इलेक्ट्रिक टू-व्हीलरचं साम्राज्य चालवतोय, यावर तुमचा विश्वास बसेल का? उत्तर प्रदेशातील गाझियाबादच्या कृष्णा ग्रोव्हर (Krishna Grover) यांनी हे करून दाखवलंय. त्यांनी आपली कॉर्पोरेट नोकरी सोडली आणि पत्नीच्या बचतीच्या पैशांवर हा व्यवसाय सुरू केला. त्यांनी सुरू केलेली 'हेराल्ड ई-बाईक' (Herald E-Bike) कंपनी आज भारतातील छोट्या शहरांमध्ये वेगाने वाढतेय. सध्या त्यांचे ३४ मॉडेल्स आणि ५५० हून अधिक शोरूम्स देशभरात आहेत.

25
हेराल्ड ई-बाईक: कृष्णा ग्रोव्हर यांचं भन्नाट यश!

कृष्णा ग्रोव्हर यांचा हा प्रवास अजिबात सोपा नव्हता. वयाच्या अवघ्या १३ व्या वर्षी त्यांनी वडिलांना गमावलं आणि लहान वयातच कुटुंबाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आली. २००५ मध्ये त्यांनी महिन्याला फक्त ३,५०० रुपये पगारावर नोकरी सुरू केली. आपल्या मेहनतीच्या जोरावर ते पुढे गेले आणि २०१४ पर्यंत एका आंतरराष्ट्रीय बीपीओ (BPO) कंपनीत मॅनेजर पदावर पोहोचले.

चांगला पगार आणि स्थिर नोकरी असली तरी, स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचं त्यांचं स्वप्न होतं. अखेर त्यांनी कॉर्पोरेट नोकरी सोडण्याचा धाडसी निर्णय घेतला. या कठीण काळात त्यांची पत्नी रितिका (Ritika) यांनी स्वतःची सगळी साठवलेली पुंजी देऊन नवऱ्याच्या स्वप्नाला भक्कम साथ दिली.

35
ई-व्हेईकल मार्केटमध्ये हेराल्ड ई-बाईकची एन्ट्री कशी झाली?

पत्नीच्या पाठिंब्याने ग्रोव्हर यांनी २०१८ मध्ये 'कृषिका सर्व्हिसेस' नावाने आपला व्यवसाय सुरू केला. नंतर त्याचं नाव 'कृषिका ईव्ही इंडिया' (Krishika EV India) असं ठेवलं. याच काळात त्यांचे जुने सहकारी आणि मित्र विनय कुमार हे को-फाउंडर (Co-founder) म्हणून त्यांच्यासोबत जोडले गेले. टियर-२ आणि टियर-३ (Tier-2 & Tier-3) शहरांमध्ये इलेक्ट्रिक वाहनांची मोठी मागणी असल्याचं त्यांनी अचूक ओळखलं.

पेट्रोलचे वाढते दर असले तरी, नवीन ब्रँड्सचा दर्जा, सुटे भाग मिळण्यातली अडचण आणि सर्व्हिसिंगच्या भीतीने लोक ई-बाईक घ्यायला घाबरायचे. लोकांची ही भीती दूर करण्यासाठी हेराल्डने कमी किंमतीत दर्जेदार गाड्या दिल्या. ग्राहकांचा विश्वास जिंकण्यासाठी त्यांनी बॅटरी आणि मोटरवर ५ वर्षांची एक्सटेंडेड वॉरंटी (Extended warranty) देऊन मार्केटमध्ये आपली जागा पक्की केली.

45
३४ मॉडेल्स आणि ५५० हून अधिक शोरूम्स:

गाझियाबादमध्ये मुख्यालय आणि दुहाई (Duhai) येथे मॅन्युफॅक्चरिंग प्लांट असलेली ही कंपनी सध्या ३४ प्रकारच्या इलेक्ट्रिक टू-व्हीलर विकते. यापैकी २३ मॉडेल्स कमी वेगाची असून त्यांना आरटीओ (Non-RTO) रजिस्ट्रेशनची गरज नाही. तर उरलेली ११ मॉडेल्स हाय-स्पीड असून त्यांना आरटीओ रजिस्ट्रेशन लागतं. फॅक्टरी उभारण्यात मोठे पैसे न अडकवता, त्यांनी ॲसेट-लाईट (Asset-light) आणि जॉब-वर्क पद्धत वापरली. यामुळे कमी भांडवलात त्यांना देशभरात नेटवर्क वाढवता आलं. आज भारतात त्यांचे ५५० हून अधिक शोरूम्स आहेत.

एनबीटी (NBT) च्या रिपोर्टनुसार, २०२३-२४ मध्ये कंपनीची कमाई ७८ लाख रुपये होती, ती पुढच्याच वर्षी १.९ कोटींवर गेली. २०२५-२६ मध्ये त्यांनी ७.८ कोटी रुपयांचा टप्पा गाठला. सध्या कंपनी दर महिन्याला १.५ कोटी रुपये कमवत असून, २०२६-२७ पर्यंत वर्षाला २० कोटी रुपये कमवण्याचं त्यांचं टार्गेट आहे.

55
नेपाळ, श्रीलंका विस्तार आणि आयपीओ (IPO) प्लॅन:

फक्त भारतीय मार्केटवर न थांबता, हेराल्ड ई-बाईकने नेपाळ आणि श्रीलंका सारख्या शेजारील देशांमध्येही आपला व्यवसाय वाढवण्याची योजना आखली आहे. तसेच, २०२९ पर्यंत शेअर बाजारात एन्ट्री करून आयपीओ (IPO) आणण्याचं त्यांचं ध्येय आहे. महिन्याला ३,५०० रुपये पगारापासून सुरू झालेला हा प्रवास, कॉर्पोरेट नोकरी सोडून पत्नीच्या बचतीवर उभा राहिलेला हा व्यवसाय, आज अनेकांसाठी मोठी प्रेरणा बनला आहे. आता भारतातील स्पर्धेच्या इलेक्ट्रिक वाहन बाजारात हेराल्ड ई-बाईक आपल्या मोठ्या नेटवर्कच्या जोरावर किती दबदबा निर्माण करते, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

Utility News (उपयुक्तता बातम्या): Check Latest उपयुक्तता बातम्या थेट in Marathi. Read वैयक्तिक कर्ज, बँकिंग टिप्स, गुंतवणूक, सोने आणि चांदीच्या किंमती बातम्या, ताज्या बातम्या at Asianet Marathi News .
Read more Photos on

Recommended Stories